Spinach
| |

पालकचे अति सेवन पचनसंस्थेसाठी हानिकारक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर त्यासाठी हिरव्या भाज्यांचा आपल्या आहारात समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हिरव्या भाज्यांमधून अनेक पोषणदायी घटक आपल्याला सहज मिळत असतात. जे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाची काळजी घेण्यास सक्षम आहेत. यातील एक महत्वाची भाजी म्हणजे पालक. पालक स्वादासोबतच आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.

पालकमध्ये कित्येक प्रकारचे जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटी ऑक्सिडंटचा मोठ्या मात्रेत समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. साधारणतः पालक कच्चा किंवा मग शिजवून असा दोन्ही पद्धतीने खाल्ला जातो. पालकांमध्ये कॅलरीचे प्रमाण अतिशय कमी असते. ज्यामुळे पालक आरोग्यदायी मानला जातो. पण यांचे अतिसेवन केल्यास शरीरातील महत्वाच्या अवयवांचे आरोग्य धोक्यात येते. यामध्ये प्रामुख्याने किडनीचा समावेश आहे.

1. अॅलर्जीची तक्रार –
अनेक लोकांना विविध पदार्थांची अॅलर्जी असते. तसेच पालक बाबत देखील काहींना अॅलर्जी असू शकते. त्यामुळे पालक खाल्ल्यानंतर संबंधित व्यक्तींना अॅलर्जीची तक्रार सुरू होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला पालक खाल्ल्यानंतर खाज, जळजळ आणि सूज येण्याची तक्रार जाणवली तर त्वरित पालक सेवन टाळा.

2. भरपूर फायबरमूळे नुकसान –
फायबर आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे पण भरपूर फायबर हानिकारक देखील ठरू शकते. पालकच्या भाजीमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पालकच्या भाजीचे वारंवार सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. शिवाय फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि पोटात पेटके येणे अशा समस्या उद्भवतात. याचा पचन संस्थेवर वाईट परिणाम होतो.

3. किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी हानिकारक –
ज्या लोकांना किडनी स्टोन आहे त्यांनी पालक अजिबातच खाऊ नये. कारण जास्त पालक खाल्ल्याने शरीरात जास्त ऑक्सॅलिक अॅसिड तयार होते. यामुळे किडनीमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन जमा होतो आणि किडनी स्टोनची समस्या वाढवतो.

4. अतिसाराची समस्या –
पालक फायबर, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन इत्यादींनी समृद्ध असतो. मात्र याचे अमर्याद प्रमाणात सेवन करणे पोटाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. यात प्रामुख्याने पालकाचे अति सेवन करणे अतिसार म्हणजेच लूज मोशनची समस्या उद्भवू शकते.

5. दातांमध्ये समस्या –
पालक खाल्ल्याने दातांची किरमिजी वाढते. यासाठी एकतर पालक जास्त खाऊ नका वा पालक खाल्ल्यानंतर ब्रश करा. यामुळे दातांच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *