| | |

हिंगाचा अतिवापर आरोग्यासाठी अतिनुकसानदायी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। फोडणीमध्ये हिंगाचा वापर केल्यास डाळ असो वा भाजी याना एक वेगळीच चव आणि सुगंध प्राप्त होतो. याशिवाय हिंग खाल्ल्याने आरोग्याला बरेच फायदे होतात हे अगदी आज्जी आई सगळेच सांगतात. पण हेच हिंग जर प्रमाणापेक्षा जास्त वापरले तर..? जसे कि आपण जाणतोच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच असतो. मग ते कितीही आरोग्यदायी का असेना.

फेरुला नावाच्या वनस्पतीच्या मुळांपासून हिंग मिळतो. हिंगाचा वापर भारतीय खानपान पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात केला वाजतो. यामुळे हिंग खाण्याचे जसे फायदे आपल्याला माहित असतात तसेच हिंग जास्त खाल्ल्याने आरोग्याचे होणारे नुकसान देखील ठाऊक असणे तितकेच गरजेचे आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला याविषयी माहिती देणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) अनियंत्रित रक्तदाब – हिंगाच्या अतिसेवनामुळे रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो. यामुळे ज्या लोकांना आधीपासून रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी एकतर हिंगापासून अंतर ठेवा किंवा मर्यादित सेवन करा. खरंतर हिंग रक्‍त पातळ करण्‍यासाठी गुणकारी म्हणून ओळखले जाते. शिवाय, हिंगामध्ये कौमरिन नामक संयुग आढळते, जे रक्ताच्या गाठी बनण्यापासून रोखते आणि रक्तप्रवाह सुधारते.

२) डोकेदुखी आणि चक्कर येणे – हिंगाचे अतिरिक्त सेवन डोकेदुखी आणि चक्कर येण्याचे कारण होऊ शकते. मात्र काही काळ विश्रांती घेतल्यानंतर हा त्रास आपोआप बरा होतो. तसं तर हिंगाचे दुष्परिणाम काही तासच राहतात आणि त्यानंतर ते आपोआप बरे होतात. पण असे होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्या.

३) गॅस व डायरिया – हिंगाचे आहारातील अतिरिक्त प्रमाण गॅस, जुलाब आणि पोटात जळजळ अश्या समस्यांना चालना देते. एवढेच नव्हे तर, खूप जास्त गॅस झाल्यास जीव घाबराघुबरादेखील होतो.

४) गर्भावस्था आणि स्तनपान – गरोदरपणात हिंगाचे सेवन प्रामुख्याने टाळा. कारण हिंगामुळे गर्भाशयाचे आकुंचन उत्तेजित होते आणि यामुळे गर्भपात होतो. शिवाय, जर तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल, तर या काळात जास्त मसालेदार अन्न खाल्ल्यास त्याचा परिणाम दुधाद्वारे थेट बाळावरही होऊ शकतो.

५) त्वचेचे विकार – हिंग खाल्ल्याने त्वचेवर लाल डाग किंवा पुरळ येऊ शकतात. जेव्हा त्वचेवर हिंगाचा दुष्परिणाम दिसून येतो तेव्हा तुम्हाला त्वचेवर लाल रंगाच्या खुणा आणि चट्टे दिसू लागतात आणि खाजही सुरू होते. हे सहसा काही मिनिटांत बरे होते. परंतु जर ही स्थिती दीर्घकाळ टिकून राहिली आणि सूज येऊ लागली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

६) ओठांवर सूज – हिंगाच्या अतिसेवनाने काही लोकांच्या ओठांवर सूज येते. ही सूज फक्त काही तासच किंवा काही दिवस टिकते. त्यानंतर ते स्वतःच बरे होते. पण तसे झाले नाही आणि सूज वाढू लागली तर वेळ न घालवता डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.