| |

मोबाइल फोनचा अतिवापर उठतोय जीवावर, ‘ही’ काळजी घ्या नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

हॅलो आरोग्य ऑनलाईन । सध्याच युग म्हणजे स्मार्टफोन युग म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. भारतात 2021 मध्ये जवळपास 76 कोटी मोबईल वापरकर्ते झाले आहेत. आणि हा आकडा उत्तरोत्तर वाढतच चालला आहे.  Statista Research या ब्रिटन स्थित संस्थेच्या अंदाजानुसार 2025 पर्यन्त भारतातील मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या ही 97 कोटीपर्यंत पोहचेल. 2016 मध्ये रिलायन्स जिओ आगमनामुळे मोबईल तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाला. आणि 4G मुळे सर्वत्र क्रांति झाली. सर्वांच्या हातात छोटे मोबईल जाऊन स्मार्ट फोन येऊ लागले. कालचे तंत्रज्ञान आज जुने होऊ लागले आहे. त्यातच आता 5G च्या आगमनाची चाहूल लागली आहे. 5G तंत्रज्ञानाने युक्त मोबईल बाजारपेठेत दाखल झाले पण आहेत. आणि जवळपास सर्वच मोबईल कंपन्या 5G टेस्टिंग करू लागल्या आहेत. 2021 च्या शेवटपर्यंत मोठ्या मेट्रो सिटी मध्ये 5G चालू होणार ही काळ्या दगडावरी पांढरी रेघ आहे. 4G पेक्षा 5G मध्ये डेटा स्पीड हजारो पटीनं वाढणार आहे. याचा फायदा बँकिंग, मेडिकल, विडियो स्ट्रीमिंग पासून ते आपल्या दैनंदिन सर्वच गोष्टीत होणार आहे. याचे फायदे तर अमर्याद आहेत पण आपण कधी विचार केला आहे का की, त्यापासून तोटे काय काय आहेत.

सध्या तर लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मोबाईलचे वेड लागले आहे. मोबाईलशिवाय काहींचा वेळच जात नाही, असं झालय. चार जणांचे कुटुंब असले तरी, चारी जण चार कोपऱ्यात मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेले चित्र तुम्हाला घरोघरी दिसेल. आता मात्र याचे गंभीर दुष्परिणाम देखील आता समोर येऊ लागले आहेत. मोबाईलमधून आणि मोबईल च्या टॉवर मधून होणारे रेडिशन हा एक गंभीरपणे चर्चिला जाणार विषय आहे.  हे तरंग कॅन्सरचा धोका निर्माण करतात. तसेच तरंगांमुळे अकॉस्टिक नर्व्ह व सलायव्हरी ग्रंथींमध्ये गाठी निर्माण होण्याचा धोकादेखील वाढतो.

मोबाईल वापराचा सर्वात मोठा दुष्परिणाम कोणत्या अवयवावर झाला असेल तर तो म्हणजे डोळे. मोबाइलच्या अतिवापराने आपल्याला डोळय़ांचेही वेगवेगळे आजार होऊ शकतात. गेम खेळणे, विडियो पाहणे, सतत चॅटिंग करणे यासाठी नेहमी  मोबाइल समोर घेऊन बसल्यामुळे आपल्याला डोळय़ांचेही अनेक आजार होऊ शकतात. चष्मा लागणं, कमी दिसणं, डोळय़ांतून सतत पाणी येणं असे वेगवेगळे त्रास होऊ लागतात. त्यामुळे मोबाइलचा अति वापर टाळणं गरजेचं आहे. शिवाय लहान मुलांच्या हातातही आपल्याला मोबाइल दिसून येतो त्यामुळे लहान वयातच मुलांना देखील चष्मा लागणं, कानाचं मशिन लागणं अशा गोष्टी घडू लागतात. शिवाय सतत एका जागी बसून गेम खेळत राहिल्याने लहान वयातच पाठ दुखी, कंबर दुखी, स्थूलपणा आणि महत्वाचे म्हणजे मानेच्या हाडाचे गंभीर दुखणे अनेक जणांच्या मागे लागले आहे.

ज्यांना मेंदूच्या कॅन्सरचा धोका टाळायचा आहे त्यांना झोपताना मोबाईल दूर ठेवूनच झोपण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. मोबाईलच्या लहरींमुळे पेट्रोल पंपावर स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तेथे गेल्यावर मोबाईलवर बोलण्यास मनाई करण्यात येते. वैज्ञानिकांच्या एका गटाने फोनच्या लिथियम आयन बॅटरींमधून निघणाऱ्या १०० पेक्षा अधिक विषारी वायूंचा शोध लावला आहे. यामध्ये कार्बन मोनॉक्साईडचा समावेश आहे. यामुळे डोळे, त्वचा व नाकात जळजळ निर्माण होते. मोबाईलच्या अतिवापरामुळे रोड अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नियम कितीही कडक केले तरीपण लोक ड्रायव्हिंग करताना सेलफोनवर बोलत असतात, त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते व अपघाताच्या प्रमाणात वाढ होते.

आपल्याबाबतीतही असं काही घडू नये म्हणून मोबाइला जास्तीत जास्त वापर टाळावा किंवा कमी करावा. तसंच योग्य पर्यायांचा वापर करणं, त्रास वाटल्यास डॉक्टरकडे जाणं हे मात्र आवर्जून करा.