| | |

आहारात रिफाईंड तेलाचा अतिवापर अवयवांना करतोय निकामी; हे दुष्परिणाम एकदा वाचाच

हॅलो आरोग्य ऑनलाईन । कोणत्याही दुकानात किंवा मॉल मध्ये गेल्यानंतर प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे तिथे गेल्यावर रिफाईंड तेलाची होणारी जाहिरात. तेलाचे डब्बे आणि पिशव्या यांच्यावर भरघोस सूट दिली जाते. त्या तेलात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असल्याचा आभास निर्माण केला जातो. त्याचबरोबर प्रसारमाध्यमे या रिफाईंड तेलाची जाहिरातींचा भडिमार करतात. साहजिकच सामान्य ग्राहक या गोष्टींना भुलून या तेलाची खरेदी करतो. पण याचा आपल्या आरोग्यावर किती मोठा दुष्परिणाम होतो याचा आपण कधी विचार केला आहे का?

आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी वात, पित्त आणि कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचे आहे. ज्याचं वात, पित्त, कफ, मन, बुद्धी आणि कर्म हे संतुलित तोच खरा निरोगी. बहुतांश आजार हा समतोल बिघडल्यामुळे होतो. ते टाळण्यासाठी शरीरातील वात दोष संतुलित ठेवणारे पदार्थ सेवन करावेत. हे संतुलन सांभाळणारे घटक म्हणजे… देशी गाईचे शुद्ध तूप आणि लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. यातील देशी गाईचे तूप आपल्याला माहित आहे. मात्र लाकडी घाण्याचे शुद्ध तेल म्हणजे काय? आपण सर्रास वापरत असलेले रिफाईंड तेल म्हणजे काय? ते कसे तयार हाते? आणि रिफाईंड तेलाचे नेमके धोके कोणते? याविषयी जाणून घेवूया…

आता पाहुयात रिफाईंड तेलाचे दुष्पपरिणाम

अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय तेल रिफाईंड तयार होतच नाही, सिंगल रिफाईंडसाठी गॅसोलिन, सिंथेटिक अँटी ऑक्सीडंटस्, हेक्सेन इ. प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. रिफाईंड तेलाचा वास येत नाही, कारण त्यात एकही प्रकारचे प्रोटीन शिल्लक राहत नाही. रिफाईंड तेलाला चिकटपणा नसतो, कारण त्यातले फॅटी अ‍ॅसिड आधीच बाहेर काढले जातात. तसंच रिफाईंड तेलामध्ये व्हिटामिन ‘ई’ आणि मिनरल्सही नसतात.

रिफाईंड तेल आपल्या आरोग्यास सर्वात जास्त हानीकारक असते, कारण त्यात वापरले जाणारे केमिकल्स मानवाच्या शरीरातील अवयवांना निकामी करतात. रिफाईंड तेलामुळे आपल्या शरीरातील आवश्यक असणारं एकही घटक नसतो. उलट केमिकल पासून बनवलेले हे तेल एक प्रकारे विष समान आहे. रिफाईंड तेलामुळे आपल्या शरीराला घातक असलेला घटक तयार होतो. त्याला एल.डी.एल. असे म्हणतात. ज्यामुळे ब्लॉकेजस् तयार होतात आणि त्यामुळेच आपल्याला हार्ट अटॅक सारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. रिफाईंड तेल खाल्ल्याने वात विकार असंतुलित राहतात. रिफाईंड तेलाची निर्मिती भारतात 30 वर्षापूर्वी झाली आणि जाहिरातींच्या माध्यमातून याचा प्रसार संपूर्ण भारतात झाला आणि आज सगळे हेच रिफाईंड तेल खातोय, ज्याचा परिणाम म्हणजे घराघरात आज लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतोय.

खरं तर तेलाला रिफाईंड करताना सुरूवातीला 300 डिग्री सेल्सिअस आणि दुसर्‍यांदा  464 डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. तेल एकदा उकळले तर ते पुन्हा खाण्यास योग्य राहत नाही. डबल रिफाईंड आणि ट्रिपल रिफाईंड करताना तर हे तेल दोनदा आणि तीनदा उकळल्याने त्यात काही विषारी घटक समाविष्ट होतात. रिफाईंड तेल तयार करण्यासाठी पाम तेलाचा सर्वात जास्त वापर केला जातो. पाम तेलामध्ये आणि डालडामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केला जातो. जे शरीराला अत्यंत घातक आहे.

आता पाहुयात लाकडी घाण्याचे शुद्ध तेलाचे फायदे

घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात 4-5 प्रकारचे प्रोटिन्स असतात, तो सुगंध त्या प्रोटीन्सचाच असतो. शुद्ध तेलाचा चिकटपणा खूप असतो. कारण त्यामध्ये आपल्या शरिराला आवश्यक असणारे फॅटी अ‍ॅसिड असतात, व्हिटॅमिन ई आणि मिनरल्स सुद्धा असतात. लाकडी घाण्यावरचे तेल सर्वोत्तम असते, कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे तेल बियांवर जास्त दाब देऊन तेल काढले जाते. शिवाय हा घाणा 1 मिनिटात फक्त 14 वेळाच फिरतो. त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही.

शरिराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लीपोप्रोटीन हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो, मात्र तो शुद्ध तेल खाण्यामुळे तयार होतो. म्हणूनच आहारात शुद्ध तेल अवश्य असावे. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो आणि त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाहीत. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबेटीस, सांधेदुखी, पॅरालिलिस, ब्रेन डॅमेज, उच्च रक्तदाब सारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.

भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दिर्घायुषी होते. 100 वर्षाच्या व्यक्तीला सुदधा गंभीर आजार नव्हते. लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान 40-45 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त नसते, त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात. त्यामुळे शुद्ध तेल खावे. तसंच एक मोठा गैरसमज आपल्या सगळ्यामध्ये आहे की, शेंगदाण्याच्या तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढते, हे चुकीचे आहे. उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे एच.डी.एल. वाढते आणि ते आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असते.

त्यामुळे आता आपल्या आहार सवयींचा फेरविचार करण्याची हीच वेळ आहे. आरोग्यदायी दिर्घायुष्य पूर्वजांनी दिलेल्या लाकडी घाण्याच्या तेलाचा वापर करूया आणि नवे आरोग्यदारी समतोल जीवनाचा अंगिकार करूया.