| |

जुलाबाच्या त्रासावर अत्यंत प्रभावी उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जुलाब म्हणजेच अतिसार हि समस्या अत्यंत त्रासदायक असते. सतत पोटात कळ येऊन वारंवार संडासला होणे, तसेच जुलाबात पाण्यासारखे पातळ विष्ठा उत्सर्जन होणे यामुळे पोटातील पाणी अचानक कमी होऊन अशक्तपणा येतो. दूषित पाणी, अन्नातून विषारी पदार्थ पोटात गेल्यामुळे वा जंतूसंसर्ग झाल्यामुळे जुलाबाचा त्रास होतो. आपल्या खाण्यापिण्यात काही चुकीच्या पदार्थांचे सेवन झाल्यास पोटातील इनफेक्शन वाढते आणि हा त्रास संभवतो. यामुळे पोटात गोळा येणे, पोट दुखणे, चक्कर येणे, मळमळ, तीव्र वेदना, अशक्तपणा असे त्रास जाणवतात. परंतु हा आजार काही गंभीर आजार नाही. योग्य ती काळजी आणि औषधोपचार केल्यास हा त्रास कमी होतो. पण यावर घरच्याघरी उपाय करायचे असतील तर यासाठी प्रभावी उपाय गरजेचे आहेत आणि आज आम्ही तुम्हाला हेच घरगुती उपाय सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) लिंबाचा रस – लिंबाचा रस जुलाबावर अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. कारण लिंबामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी आणि अॅसिडिक गुणधर्म असतात. जे शरीरातील पीएच बॅलन्स संतुलित करतात. तसेच यातील मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम शरीराला पुरेसे पोषण देतात. यासाठी,
दिवसभरात २-३ वेळा लिंबाचा रस प्या.

२) मेथी दाणे – जुलाबाचा त्रास थांबण्यासाठी मेथी दाणे लाभदायक आहेत. कारण मेथीमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅंटिफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटातील इनफेक्शन लवकर दूर करता येते. यासाठी,
मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. यानंतर भिजवलेले दाणे वाटून त्याची पेस्ट तयार करा वा मेथीचे दाणे कोरडेच वाटून त्याची पावडर करा. मेथीची पावडर वा मेथीची पेस्ट पाण्यात टाकून ते पाणी प्या.

३) जिरा पाणी – जिऱ्यामध्ये अॅंटि सेप्टिक आणि अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे जुलाबात जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर आहे. ज्यामुळे डिहायड्रेट झालेले शरीर लवकर रिकव्हर होऊन तापमान संतुलित राहण्यास मदत होते. यासाठी,
एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भाजून टाका. ते पाणी उकळून थंड झाल्यावर गाळून घ्या. थोडे थोडे दिवसभर जिऱ्याचे पाणी पिण्यामुळे शरीराचा थकवा कमी होतो आणि जुलाबही थांबतात.

४) दही – दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. ज्याचा पोटातील आतड्यांवर चांगला परिणाम होतो. यामुळे पोटातील इन्फेक्शनवर दही खाणं फायदेशीर ठरते. दह्यामुळे पोटातील जंतू नष्ट होतात आणि पोटाला आराम मिळतो. यासाठी,
एक वाटी अधमुरं दही घ्या आणि त्यात थोडं मीठ, सैधव अथवा काळीमिरी पावडर टाकून ते खा. दिवसभरात २-३ वेळा दही खा. यामुळे पोटातील आव बांधली जाते आणि जुलाबाचा त्रास कमी होतो.

५) ताक – ताकामध्ये भरपूर प्रोबायोटिक्स असतात. यासाठीच जुलाब झाल्यास ताक पिण्यामुळे शरीराला लवकर आराम मिळतो. शरीराचा दाह कमी करण्यासाठी आणि पचन सुरळीत सुरू होण्यासाठी ताकाचा वापर करणे फायद्याचे ठरते. यासाठी,
जुलाब झाल्यास एक ग्लास थंड ताक प्या. ताकामध्ये सैधव आणि काळीमिरी पावडर टाकण्यामुळे जुलाब लवकर थांबतात.

६) पुदिना आणि मध – जुलाब झाल्यास पुदिना आणि मध एकत्र करून खा. कारण पुदिना आणि मधात पोटाला थंडावा देणारा घटक असतात. जुलाबामुळे पोटात जळजळ होत असेल तर या मिश्रणाचे सेवन पोटाला चांगला आराम देते. यासाठी,
एक चमचा पुदिनाच्या रस, एक चमचा मध आणि थोडा लिंबाचा रस एकत्र करा. सर्व मिश्रण कोमट पाण्यात मिसळून दिवसभरात १-२ वेळा प्या.

७) शेवग्याची पाने – शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ल्यामुळे जुलाब थांबतात. कारण शेवग्याच्या पानांमध्ये शरीराला पोषण मिळेल असे घटक असतात. शिवाय, अॅंटि मायक्रोबायल आणि अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत होते. जुलाबामुळे मळमळ, उलटी अथवा पोटदुखी जाणवत असेल तर शेवग्याच्या पानांचा वापर जरूर करा. यासाठी,
शेवग्याच्या पानांची भाजी नियमित खा. तसेच शेवग्याच्या पानांचा रस मधात मिसळून घ्या. यामुळे जुलाब लगेच थांबतात.

८) केळी – पिकलेले वा कच्चे केळे खाणे हा जुलाबावर उत्तम उपाय आहे. कारण, केळ्यामध्ये पोटातील आतड्यांमधील पाणी शोषून आव बांधण्यास मदत होते. ज्यामुळे जुलाब थांबतात आणि शौचाला साफ होते. तसेच केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असते. ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. यासाठी,
पिकलेलं केळ कसेही खा. अगदी केळाचे शिकरण खाल्ले तरीही लाभदायक ठरेल. तर, कच्च्या केळ्याचे काप वा स्मुदी पिण्यामुळे लवकर फायदा होतो.