| |

असह्य दातदुखीवर अत्यंत प्रभावी उपाय; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो, साधारणपणे दात किडल्यामूळे दाताच्या नसांवर ताण येतो आणि परिणामी दातदुखी उद्भवते. तसेच आहार, बदलती जीवनशैली यासारख्या कारणांसह मानसिक ताण तणावांमुळेही दातांचे आरोग्य बिघडते. याशिवाय सतत सर्दी,अति थंड खाणे किंवा अति गरम खाणे यामुळेदेखील दाताच्या नसांवर प्रभाव पडतो आणि दातदुखी होण्याची शक्यता असते. यामुळे मग डॉक्टरकडे जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही असे वाटू लागते. कारण या वेदना इतक्या असह्य करणाऱ्या असतात कि सगळंच नकोस होतं. काही खाता येत नाही का पिता येत नाही. कधी कधी दुखणाऱ्या दाताला सतत बोट लावणे वा जीभ लावणे यामुळे जखमा होण्याचीही शक्यता असते. यामुळे हिरड्यांवर सूज येते. अशामुळे त्वरित आराम मिळावा म्हणून काही ना काही उपाय करणे अत्यंत गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊयात अश्या त्रासदायक दातदुखीवर आराम मिळवण्यासाठीची अत्यंत प्रभावी असे घरगुती उपाय खालीलप्रमाणे:-

१) बर्फ – दुखणाऱ्या दाताच्या भागावर साधारण १५ ते २० मिनिटांपर्यंत बर्फाचा तुकडा लावावा. यामुळे नसा सुन्न होऊन अनेकदा हिरड्यांवरील सूज उतरते आणि दातदुखीपासून अराम मिळतो.

२) लिंबू – लिंबामध्ये व्हिटामिन सी असते. त्यामुळे दातदुखीसाठी लिंबू मदत करते. यासाठी जो दात दुखत आहे तिथे लिंबाच्या चकत्या ठेवा. यामुळे लवकर आराम मिळतो.

३) बटाटा – दात दुखीसोबत हिरडीवर सूज चढलेली असेल तर बटाटा सोलून त्याच्या चकत्या कराव्या आणि दुखत असलेल्या भागावर १५ मिनिटांपर्यंत ठेवाव्यात. यामुळे दातदुखीपासून आराम मिळतोच आणि सूजदेखील उतरते.

४) ​मोहरीचे तेल – साधारण ३ – ४ थेंब मोहरीचे तेल घ्या आणि या तेलामध्ये एक चिमूटभर मीठ टाका. यानंतर हे मिश्रण घेऊन हलक्या बोटाने दात आणि हिरड्यांना मसाज करा. यामुळे दातदुखीपासून आराम मिळेल.

५) ​काळीमिरी पावडर – एक चतुर्थांश चमचा मिठामध्ये फक्त एक चिमूटभर काळ्या मिरीची पावडर मिसळून दुखणाऱ्या दाताच्या भागात लावा. थोडा त्रास होईल पण नक्कीच आराम मिळेल.

६) ​पेपरमेंट – पेपरमेंट अर्थात पुदिना. पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब दुखऱ्या दातावर टाका. यामुळे लवकर आराम मिळेल.

७) ​पेरूची पाने – जो दात दुखत असेल तेथे पेरूची पाने ठेऊन चावा. यामुळे दातदुखीपासून आराम मिळेल. याशिवाय १ कप पाण्यात पेरूची पाने चांगली उकळून घ्या आणि या पाण्याला माऊथवॉशप्रमाणे वापरा. यामुळेही आराम मिळेल.

८) ​तेजपत्ता – तेजपत्ता एक प्राकृतिक वेदनानाशक उपाय आहे. यामुळे दुखण्यापासून त्वरित आराम मिळवायचा असेल तर तेजपत्ता गुणकारी आहे. तेजपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे दातांमधील कीड आणि दुर्गंधी दूर करते. यासाठी तेजपत्ताची पावडर दुखतंय दाताच्या भागावर १० मिनिटे लावून ठेवा नंतर चूळ भरा. याशिवाय तेजपट्ट्याची ४-५ पाने टाकून पाणी उकळून घ्या आणि या पाण्याने गुळण्या करा.