Eating
| | |

सतत खा खा वाटतं? खायचा पदार्थ पाहिला कि थांबवत नाही?; जाणून घ्या कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सर्वसाधारणपणे भूक लागणे हि अतिशय सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे. कारण आपले पोट भरलेले असेल तर डोकं आणि मन दोन्ही शांत राहत. पण जर तुम्हाला सतत भूक लागत असेल आणि म्हणून तुम्ही सतत खात असाल तर मात्र हि गंभीर बाब असू शकते. कारण भूकेच गणित बिघडल तर शरीरात कोणतातरी दोष उत्पन्न झाला असण्याची शक्यता असते. इतकेच नव्हे तर सतत भूक लागणे काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. अनेकदा डिहायड्रेशन किंवा गरोदरपणात सतत भूक लागते पण या व्यतिरिक्त देखील तुम्हाला सतत भूक लागत असेल तर मात्र चिंतेची बाब आहे. म्हणूनच आज आपण भुकेच्या बिघडलेल्या गणितामागे कोणते आजार आणि कोणती कारणे दडली आहेत हे जाणून घेणार आहोत.

० सतत भूक लागण्याची कारणे आणि आजार:-

१. मधुमेह

Diabetes

मधुमेह हल्ली सर्व वयोगटात झपाट्याने वाढतोय. याचे कारणं चुकीची जीवनपद्धती आहे. हा आजार वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो आणि सतत भूक लागणे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे भुकेच्या बदल झाल्यास दुर्लक्ष न करता त्वरित स्वतःची वैद्यकीय चाचणी करून घ्या.

२. अनियमित आहार

Full Plate Of Food

अनियमित आहार आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतो. याला इटिंग डिसऑर्डर म्हणतात. अशी व्यक्ती संपूर्ण दिवसभरात अनियमितपणे खाते. अनेकदा अति खाल्ल्याने अशा लोकांना उलटीचा त्रास होतो. या व्यक्ती आहाराबाबत गोंधळलेल्या असतात आणि मनात येईल तेव्हा वाटेल ते खातात.

३. पोटात जंत होणे

पोटात जंत झाल्यास सतत भूक लागते. कारण जंत हे परजीवी असून आपल्या पोटातील आहारातून मिळणारी पोषकद्रव्य ते शोषून घेतात. यामधून शरीरामध्ये फॅट वाढते.

४. काही औषधे

जर तुम्ही सतत कोणत्याही लहान आजारावरदेखील काही औषधे घेत असाल तर अशा औषधांमुळेही सतत भूक लागते. म्हणूनच आपल्या रोजच्या औषधांबरोबर जर काही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय आपण केले तर औषधांची मात्रा कमी होईल.

५. ताण तणाव

ताणतणावामूळे व्यक्ती अमर्याद खातात. तणावामुळे त्यांच्यात सतत खाण्याची इच्छा बळावते आणि याचा परिणाम मेंदूवर होतो. अशामुळे भूकेचे प्रमाण वाढते.