Uneasy Feeling
| | |

अस्वस्थ वाटतंय..? मग ‘हे’ पदार्थ रोज खा आणि ताजे तवाने रहा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कधी कधी खूप दमल्यासारखं, थकल्यासारखं होतं. शिवाय काय करू आणि काय नाही असं काहीसं अस्वस्थ वाटू लागतं. याच कारण माहित नसतं पण बहुतेक सगळेच लोक अशा परिस्थितीतून कधी ना कधी गेलेले असतात किंवा जात असतात. याचे कारण म्हणजे, आपण करीत असलेल्या विचारांचा येणार ताण. याशिवाय एखाद्या गोष्टीबाबत अधिक चिंता करणे. यामुळे संबंधित व्यक्ती धूम्रपान, अल्कोहोलकडे आकर्षित होते. याशिवाय जास्त प्रमाणात खाणेदेखील सुरू करते. कशाला पितोस विचारले असता अल्कोहोल आणि धुम्रपानामुळे चिंता कमी होते अशी उत्तर मिळतात.

पण मित्रांनो हे पदार्थ आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. म्हणूनच जर तुम्ही किंवा तुमच्या संपर्कातील कोणतीही व्यक्ती अशा समस्येने ग्रासलेली असेल तर आज आम्ही तुम्हाला जे पदार्थ सांगणार आहोत त्याचे सेवन करायला सांगा. यामुळे नैराश्याचे कोणतेही लक्षण असेल तर दूर होईल. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

Fruits

1. फळं –
अचानक अस्वस्थ वाटू लागले कि अनेकदा गोड खावेसे वाटते. अशावेळी खाण्यासाठी फळांचा चॉईस निवडा. कारण फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. शिवाय फळांमधील अँटी-ऑक्सिडंट्स पेशींचे तणावामुळे होणारे नुकसान थांबवतात. दरम्यान लिंबू, संत्री, स्ट्रॉबेरी आणि काळी तसेच हिरवी द्राक्ष या फळांचे सेवन करणे फायदेशीर आहे.

2. डार्क चॉकलेट –
डार्क चॉकलेट चवीला इतर चॉकलेटसारखं गोड नसलं तरीही ते खाल्ल्याने शरीरातील हॅपी हार्मोन्स सक्रिय राहतात. ज्यामुळे मूड चांगला राहतो. मेंदूचे काम सुरळीत चालू राहते आणि मुख्य म्हणजे मेंदूच्या नसांना आराम मिळतो. शिवाय डार्क चॉकलेटमध्ये जे पोषक घटक असतात ते अँटि ऑक्सिडंट म्हणून काम करतात. यामुळे नैराश्य आणि चिंता दूर राहते.

3. ड्राय फ्रुट्स –
ड्राय फ्रुट्स म्हणजे सुका मेवा. यामध्ये काजू, अक्रोड, मनुके आणि बदाम यांचा समावेश होतो. या ड्राय फ्रूट्समध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट, प्रोटीन आणि मॅग्नेशियम असते. जे शरीरातील न्यूरोट्रांसमीटर राखते. परिणामी मेंदूचे कार्य उत्तम चालू राहते. यामुळे मूड देखील चांगला राहतो आणि ताण तणाव दूर राहतो.

4. हर्बल टी –
तणावामूळे नैराश्य येऊ शकते. ज्यामुळे मानसिक अस्थैर्य निर्माण होते. अशावेळी लॅव्हेंडर, कॅमोमाइल, ग्रीन टी यांसारख्या औषधी वनस्पतींपासून भरपूर प्रमाणात अँटी- ऑक्सिडेंट शरीराला मिळतात. यामुळे मेंदूच्या नसा शांत होतात. शिवाय शांत आणि चांगली झोप लागते. शरीर डिटॉक्स होते.