| |

अकाली वृद्धत्वावर माश्याचे तेल अतिशय परिणामकारक; कसे ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जर आपल्याला आपले शारीरिक, मानसिक आणि सौंदर्यसंबंधित आरोग्य अगदी उत्तम राखायचे असेल तर व्यायामासोबत माशाच्या तेलाचे सेवन करणे हा जालीम पर्याय आहे. एका संशोधनानुसार, माश्याच्या तेलाचे सेवन केल्यास व्यक्तीचे तारुण्य अधिक काळ टिकते. याचे कारण असे कि, माशाच्या तेलामुळे व्यक्तीच्या मांसपेशीत नव्याने ताकद निर्माण होते. परिणामी आपली त्वचा सतेज राहते आणि उजळ व नेहमी ताजी टवटवीत दिसते. मात्र तरीही, संशोधकांनी अद्याप माश्याचे तेल पूर्णपणे सौंदर्यवर्धक असल्याचे स्पष्ट केलेले नाही. दरम्यान यासाठी आणखी सखोल अभ्यास आणि संशोधन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

माश्याच्या तेलाची परिणामकारकता आजमावण्यासाठी संशोधकांनी याचा एका ६५ वर्षीय महिलेवर प्रयोग करून निष्कर्ष काढले आहेत. हे निष्कर्ष शुद्ध आणि सकारात्मक होते. मुख्य बाब सांगायची तर, माशाच्या तेलात आढळणारा ओमेगा- ३ हा घटक आपल्या हृदयासाठी फायदेशीर असते असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

वृद्धावस्थेत व्यक्तीच्या शरीरातील मांसपेशी हळूहळू कमकुवत होऊ लागतात. इतकेच नव्हे तर आकुंचन पावतात. याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होत असतो. तो परिणाम असा कि, त्वचेवर अकाली सुरकुत्या येतात. त्वचा कोरडी पडते. यामुळे आपण अधिक वयाचे असल्यासारखे दिसू लागतो. तसेच अंगदुखी, गुडघेदुखी, दिवसभर मरगळ – थकवा आणि चालताना पायाच्या पोटऱ्यांमध्ये होणार्‍या वेदना यांसाठी मांस पेशींचे आकुंचन हेच मुख्य कारण असल्याचे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

मात्र या सर्व समस्यांवर माशाचे तेल अतिशय प्रभावी असते. प्रामुख्याने माशाचे तेल शरीरातील मांसपेशींचे अखडणे वा लोप पावणे यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र आपल्याला आरोग्याशी संबंधित चांगले परिणाम हवे असतील तर त्यासाठी माशाच्या तेलाचा दर्जा हा उत्तम असायला हवा. पण अलीकडे माशाच्या तेलात अगदी मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याने त्याचा व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे या तेलाचे सेवन करण्याआधी त्याची योग्यता आणि दर्जा पारखून घ्यावे, असे तज्ञांकडून सांगितले जाते.