|

डोळा फडफडणे असू शकते गंभीर आजाराचे लक्षण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांचा असा समज आहे कि, डोळा फडफडायला लागला म्हणजे आता काहीतरी अघटीत होणार. पण कधीतरी तुम्ही विचार केलाय? कि डोळा फडफडण्यामागे याशिवाय काहीतरी अन्य आणि गंभीर कारण असू शकते का ते? नाही ना..? खरतर डोळा फडफडणे म्हणजे आपल्या शरीरात काही आजारांची लक्षणे आढळली असण्याचा एक संकेत असतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला डोळा फडफडण्यामागची नेमकी करणे काय आहेत ते सांगणार आहोत.

* डोळा फडफडण्याची कारणे – पापण्यांच्या स्नायूंमध्ये विशेष तणाव निर्माण झाल्याने डोळ्याची उघडझाप होते. दरम्यान हे खालच्या आणि वरच्या दोन्ही पापण्यांमध्ये होऊ शकते. वैद्यकीय भाषेत या समस्येचे तीन वेगवेगळ्या भागांत वर्गीकरण केले आहे. यांना मायोकेमिया, ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म असे म्हणतात.

१) मायोकेमिया – मायोकेमिया स्नायूंच्या सामान्य संकुचितपणामुळे होतो. डोळ्याच्या खालच्या पापण्यांवर याचा जास्त परिणाम होतो. शिवाय हे अगदी थोड्या वेळासाठी असते आणि जीवन शैलीतील बदलांद्वारे यावर मात करता येते.

२) ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म – ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म दोन्ही अनुवांशिक कारणांमुळे होतात. मुख्य म्हणजे या दोन्हीही समस्या अत्यंत गंभीर आहेत. या अवस्थेत, रुग्णाला डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असते.

* डोळे फडफडण्याची इतर कारणं

३) डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मेंदूच्या कार्यात बिघाड किंवा नर्व डिसॉर्डरमुळे एखाद्याचा डोळा फडफडू शकतो. यात बॅन पल्सी, डायस्टोनिया, सर्विकल डायस्टोनिया, मल्टीपल सेलोरोसिस आणि पार्किन्सन यांसारख्या विकारांचा समावेश आहे. तर जीवन शैलीतील काही त्रुटींमुळे लोकांना अशा समस्या येऊ शकतात.

४) आय स्ट्रेन – जर संपूर्ण दिवसभरातील अत्याधिक काळ तुम्ही लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईलच्या चालू स्क्रिनसमोर कार्यरत असाल, तर आय स्ट्रेनची समस्या उद्भवू शकते. अशावेळी डोळ्यांना विशेष आरामाची आवश्यकता असते.

५) अपूर्ण झोप – डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीने कमीत कमी ७ ते ९ तासांची झोप हि घेतलीच पाहिजे. त्यापेक्षा कमी झोप घेतल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि डोळ्याच्या स्नायूंना सूज येते.

६) मानसिक ताण – तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मानसिक ताण तणावामुळेदेखील डोळा फडफडण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे योग्य तितका मानसिक आणि शारीरिक आराम या गरजेचा आहे.