Blood Group Wise Diet
| | |

वाढत्या वजनाचा कशाला विचार..? डाएट फॉलो करा ब्लड ग्रुपनुसार; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपलं शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी असावे यासाठी कितीतरी लोक रोज भरपूर व्यायाम आणि कडक डाएट फॉलो करतात. पण अनेकांना हे माहीतच नसतं कि डाएट म्हणजे नक्की काय..? डाएट कसं असावं आणि कसं करावं? या नादात बरेच लोक उपाशी राहतात आणि डाएट करतात. असे अयोग्य पद्धतीचे डाएट शरीरावर उलट परिणाम करतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योग्य डाएट अतिशय महत्त्वाचं आहे.

तज्ञांच्या सल्ल्यानुसार बनवलेला डाएट चार्ट आरोग्यदायी असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या ब्लड ग्रुपनुसारदेखील एक डाएट प्लॅन बनवता येतो. जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता प्रत्येक रक्तगटाचा स्वतंत्र असा एक स्वभाव असल्यामुळे प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात. चला तर जाणून घेऊया रक्तगट आणि त्यानुसार डाएट.

रक्तगट

A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह.

B निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह.

AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह.

O पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह.

१. ‘A’ रक्तगट –

रक्तगट ‘A’ असणाऱ्या लोकांनी डाएटची काळजी घ्यावी. यात हिरव्या भाज्यांव्यतिरिक्त मासे, डाळींवर अधिक भर द्यावा. त्यात वजन घटवायचे असेल तर ऑलिव्ह ऑईल, डेअरी उत्पादनं, मका आणि मासे हे पर्याय उत्तम. या रक्तगटाच्या लोकांची इम्युनिटी सिस्टीम संवेदनशील असते. यामुळे त्यांनी निरोगी आरोग्यासाठी मांस खाण्याचं प्रमाण कमी करावं. कारण ते पचण्यास जड असतं. म्हणून ब्लड ग्रुप ‘A’ च्या व्यक्तींनी चिकन-मटणाचं सेवन कमी करावं.

२. ‘B’ रक्तगट –

‘B’ रक्तगट असणाऱ्यांनी आहारातून काहीही वर्ज्य करण्याची आवश्यकता नसते. अगदी हिरव्या पालेभाज्या, फळ, मासे, मटण आणि चिकन असे सर्व काही हे लोक खाऊ शकतात. कारण ‘B’ रक्तगट असणाऱ्या लोकांची पचनक्रिया चांगली असते. यामुळे त्यांच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. तसेच या रक्तगटाचे लोक दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी या पदार्थांचे भरपूर सेवन करू शकतात. मात्र खाण्यावर योग्य नियंत्रण जरूर ठेवा.

३. ‘AB’ रक्तगट –

‘AB’ रक्तगट असणाऱ्यांनी ज्या गोष्टी रक्तगट ‘A’ आणि ‘B’ साठी वर्ज्य करण्यास सांगितल्या आहेत त्या सर्व सूचनांचं पालन करावं. तसंच या लोकांनी फळ आणि भाज्यांचे अधिक सेवन करावे. या रक्तगटाच्या लोकांनी अंडी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, लोणी यांसारखे पदार्थ खावे. पण मांसाहार कमी करावा.

४. ‘O’ रक्तगट –

‘O’ रक्तगट असणाऱ्यांनी प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. यात डाळ, मांस, मासे, फळांचा समावेश असावा. कडधान्य आणि डाळींसह डाएटमध्ये फळांचंही प्रमाण वाढवावं.

आहार नियोजन

– रक्तगट कोणताही असो पण सकाळचा नाश्ता टाळू नका. कारण सकाळच्या नाश्त्यावर आपली संपूर्ण दिवसभराची ऊर्जा अवलंबून असते. म्हणून नाश्ता भरपेट असावा.

– यानंतर दुपारच्या जेवणात २ चपात्या किंवा १ भाकरी, १ वाटी भाजी, १ वाटी डाळ आणि ताक किंवा दही असावे. यामुळे आवश्यक फायबरची पूर्तता होते.

– यानंतर साधारण संध्याकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास १ कप ग्रीन टी आणि १ वाटी स्प्राऊट्स/ मखाना/ भाजेलेले चणे असे हलके काहीही खावे.

– मात्र रात्रीचा आहार अत्यंत हलका असावा. यात पचायला जड असणारे कोणतेही पदार्थ नसावे.

महत्त्वाचे:- दिवसभरात जवळपास अडीच लीटर पाणी प्यावे.