| |

ट्रेंडिंग ग्लास लिप लुकसाठी ‘या’ टिप्स फॉलो करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जगातली प्रत्येक स्त्री हि सुंदरच असते. पण तरीही जितकी जीवनशैली आधुनिक होत आहे तितका जगण्याचा ट्रेंड बदलतो आहे. त्यामुळे आजच्या स्त्रीसाठी मेकअप करणे ही गरज झाली आहे. सगळ्यात हटके, फॅशनेबल, स्टायलिश आणि आयकॉनिक दिसायचे असेल तर लेटेस्ट ट्रेंडसोबत असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे सण असो वा लग्नसोहळा, पार्टी असो वा सेलिब्रेशन, ऑफिस असो वा कॉलेज सगळीकडेच आपल्या लूकची चर्चा असावी म्हणून प्रत्येक स्त्री तिच्या सोयीनुसार आणि ट्रेंडप्रमाणे मेकअप करते. त्यामुळे आता कोणता ट्रेंड सुरू आहे हे प्रत्येकीला माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर ना?

तर मैत्रिणींनो आज आम्ही तुम्हाला सगळ्यात ओव्हर ट्रेंड करणाऱ्या एका नव्या लीप लुकबद्दल सांगणार आहोत. याच नाव आहे ग्लास लिप लुक. या लुकमुळे तुमचे ओठ काचेप्रमाणे चकाकणारे करता येतात. सेलिब्रेटीजमध्ये हा ग्लास लिप लुक खूप लोकप्रिय असल्यामुळे तो ट्रेंड करत आहे. चला तर परफेक्ट ग्लास लीप लूकसाठी जाणून घ्या खास मेकअप टिप्स खालीलप्रमाणे:-

स्टेप 1 – जर तुम्हाला ग्लास लिप लुक करायचा आहे तर आधी तुमचा चेहरा आणि स्किन यासाठी तयार करा. यासाठी त्वचेला इव्हन करावे लागेल.
– सर्वात आधी त्वचा स्वच्छ करा.
– आता ओठांवरील डेड स्कीन काढण्यासाठी लिक्विड एक्सफोलिएटरचा वापर करा.

स्टेप 2 – चेहरा स्वच्छ केल्यानंतर ओठांची निगा राखण्यासाठी त्यावर लिप बाम लावा.
– लीप बाम लावल्याने ओठ हायड्रेट होतील आणि कोरडेपणा कमी होईल.

स्टेप 3 – यानंतर कोणतीही लिपस्टिक वा लिप ग्लॉस ओठांवर थेट लावण्याआधी लिप पेन्सिलने ओठांना परफेक्ट शेप द्या.
– यामुळे ओठांना क्लीन आणि बोल्ड लुक मिळेल.
– नियमित लिपस्टिक शेडपेक्षा डार्क शेड लिप पेन्सिल निवडा.
– आता ओठांना शेप देण्यासाठी क्युपिड बो पासून सुरूवात करा आणि खालच्या ओठापर्यंत शेप द्या.
– आऊट लूकसाठी हलका स्ट्रोक द्या. त्यानंतर तुमची कोणतीही फेव्हरेट लिपस्टिक वापरून ओठांना फिल करा.

स्टेप 4 – आता ओठांना परफेक्ट ग्लास इफेक्ट यावा म्हणून ओठांवर उत्तम दर्जाचा ग्लॉस लावा.
– कोटिंगमुळे तुमचे ओठ चकाकतील.
– फक्त ओठ हायलाइट करताना ओठांच्या मध्यभागी ग्लॉस लावा आणि मग तो ओठांवर पसरवा. आता एकदा स्वतःला नीट पहा आणि पहा तुमचा ग्लॉसी आणि आयकॉनिक ट्रेंडिंग ग्लास लिप लुक. आहे ना एकदम क्लासी.? आता कोणत्याही फंक्शनसाठी तयार होताना हा लूक नक्की ट्राय करा.