Coconut Oil For Hair
| | |

निरोगी केसांसाठी नारळाच्या तेलात ‘हे’ पदार्थ मिसळा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर, लांबसडक, दाट आणि मजबूत केस हे सौंदर्य खुलवण्यासाठी आवश्यक असतात. पण आजकालची जीवनशैली, चुकीचा आहार आणि मुख्य म्हणजे वाढते प्रदूषण, धूळ, माती यामुळे केसांच्या आरोग्याची हानी होते. यामुळे केसांचे विरळ होणे, केसात कोंडा होणे, स्कॅल्प इन्फेक्शन अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मग अशावेळी विविध औषधे आणि महागडी उत्पादने वापरण्यावर भर दिला जातो. ज्याची खरंतर आवश्यकता नसते. कारण फक्त खोबरेल तेलाच्या साहाय्याने देखील तुम्ही केसांची योग्य निगा राखू शकता. पण कसे? जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

या उपायांमधील खोबरेल तेल हे आपल्या आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यामुळे फक्त खोबरेल तेलाच्या साहाय्याने आपल्या केसांची गेलेली चमक आपण परत मिळवू शकतो. पण वरील पदार्थ खोबरेल तेलात मिसळले असता त्याचा प्रभाव आणखी गुणकारी होतो. शिवाय त्याचे परिणाम लवकर दिसून येतात. आपल्याला अत्यंत प्राचीन अशी आयुर्वेदाची परंपरा आहे. यातही नारळाच्या तेलासह कांद्याचा रस, कडीपत्ता, लसूण, कापूर, आवळ्याची पावडर, जास्वंद या पदार्थांचा वापर करण्याविषयी लिहिलेले आहे. कारण ८५% फॅटी ॲसिड समाविष्ट असलेले नारळाचे तेल वरील पदार्थांच्या मिश्रणाने आणखी प्रभावी होते. शिवाय वरील उपाय हे बुरशीनाशक आणि संसर्ग रोखणारे आहेत. त्यामुळे सुंदर आणि निरोगी केसांसाठी एकदा जरूर करून पहा.