| |

सुवासिक द्रव्यांचा आरोग्याशी प्राचीन आणि गहरा संबंध; अधिक जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। राजा महाराजांच्या काळापासून अनेक विविध प्रकारच्या अत्तर आणि सुवासाचे वर्णन इतिहासात केलेले आहे. यात केसर, गुलाब, मोगरा, चमेली, चंदन आणि लोबान अश्या सुवासिक गंधांचा समावेश आहे. या सुवासी गंधांचा राजा महाराजांच्या मनोरंजनासाठी वापर केला जात असे. इतकेच नव्हे, तर याद्वारे अनेक रोगांवरही उपचार केला जात असे. यामुळे सुवासाचा आणि आरोग्याचा प्राचीन तसाच गहरा संबंध आहे. आजच्या आधुनिक काळातील बदलत्या जीवन शैलीप्रमाणे प्राचीन उपचार पद्धती मागे सुटल्या असल्या तरीही वेगवेगळ्या रूपांत त्यांचा अवलंबव केला जात आहे. तर आज अश्याच काही विविध माध्यमाची ओळख आणि वापर आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.

१) त्वचा संबंधित – यामध्ये सामान्य त्वचेसाठी बेंझोनींन, गाजर, केशर, लोबान किंवा गंधरस, सिप्रेस, जिरॅनियम, चमेली, लव्हेंडर, लेमन, मार्जोटम, पामारोझ, पचौली, पेपरमिंट, रोझमेरी या सुवासांचा वापर होतो. तर कोरड्या त्वचेसाठी बेंझोनिन, गाजर, केशर, जिरॅनियम, हीसोप, लेमन, नेरोली, पामरोझ, गुलाब, रोझमेरी, चंदन या सुवासिक द्रव्यांचा वापर होतो. शिवाय रुक्ष त्वचेसाठी गाजर, जिरॅनियम, लव्हेंडर या सुवासिकांचा वापर केला जातो आणि आद्र त्वचा असेल तर गाजर, जिरॅनियम, हिसोप, लव्हेंडर, लेमन, पामरोझ, गुलाब आणि चंदन या सुवासिकांचा वापर करतात. या व्यतिरिक्त संवेदनशील त्वचेकरिता गाजर, केशर, जिरॅनियम, लव्हेंडर आणि असामान्य त्वचेकरिता गाजर, केशर, जिरॅनियम, लव्हेंडर, लेमन, पामरोझ, चंदन हि सुवासिक वापरली जातात.

२) शरीरोपयोगी तेल – यामध्ये कोरड्या त्वचेसाठी बेंझोनिन, पामरोझ, पेचोली, गाजर, जिरॅनियम, पेट्टी ग्रैन, लव्हेंडर, कुसुम, गुलाब, चंदन या सुवासिक तेलांचा उपयोग होतो. तर चिकट त्वचेसाठी लव्हेंडर, संत्री, लेमन, कापूर आणि नेरोलीच्या तेलाचा वापर केला जातो. या शिवाय अगदी सर्व सामान्य त्वचेसाठी पामरोझ, गाजर, जिरॅनियम, लव्हेंडर, कुसुम, चमेली, चंदन या सुवासिक तेलांचा वापर करतात आणि असामान्य त्वचेसाठी जिरॅनियम, लव्हेंडर, कुसुम, कापूर, निलगिरीच्या तेलाचा उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त संवेदनशील त्वचेसाठी जिरॅनियम, लव्हेंडर आणि कुसुमच्या तेलाचा वापर होतो.

*या सर्व सुवासिक द्रव्यांचा आणि तेलांचा आरोग्यदायी आणि सौंदर्यवर्धक फायदा आहे. यांचा वापर केल्याने इतिहास जमा राजा राणीचे सौंदर्य खुलत होते. यामुळे आजही अनेक ठिकाणी या द्रव्यांचा वापर करून चमकती त्वचा मिळवली जाते.