| |

थंडीच्या दिवसात वारंवार गरम पाणी पिण्याची सवय करू शकते आरोग्याचे नुकसान; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक लोकांना हिवाळ्याचा हंगाम सुरु झाला कि गरम पाण्याच्या उचक्या लागतात. अर्थात बाकी दिवशी हे लोक अगदी साधं किंवा थंड पाणी पिणे पसंत करतात. पण ऐन हिवाळ्यात थंडी आली कि हेच लोक अगदी दिवस दिवसभर गरम पाणी पितात. काही अंशी गरम पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. पण सतत गरजेपेक्षा जास्त गरम पाणी पिणे शरीराचे पुरते नुकसान करू शकते. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा दुष्परिणाम देणाराच असतो. चला तर जाणून घेऊयात थंडीच्या दिवसात सतत गरम पाणी प्यायल्याने शरीराचे काय नुकसान होते ते खालीलप्रमाणे:-

१) शरीरातील पाण्याचा समतोल बिघडतो.
– अभ्यासानुसार माणसाच्या शरीरात सुमारे ७०% पाणी असते. हे पाणी आपल्या शरीरात ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. म्हणून रोज किमान ७ – ८ ग्लास साधे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र, याऐवजी गरम पाणी गरजेपेक्षा जास्त प्यायले तर शरीरातील पाण्याचा समतोल बिघडतो. यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या होऊ शकतात.

२) किडनीवर दबाव येतो.
– प्रमाण आणि गरज याहून जास्त गरम पाणी प्यायल्याने याचा थेट आपल्या किडनीवर परिणाम होतो. सतत गरम पाणी प्यायल्याने किडनीवर दबाव येतो. किडनीचे काम असते शरीरातील टॉक्सिन्स शरीरबाहेर काढून टाकणे. दरम्यान गरम पाणी किडनीवर जास्त दबाव आणते. ते शरीरात डिहायड्रेशन करते, ज्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. म्हणून सतत गरम पाणी पिणे टाळा.

३) शरीरातील रक्ताचे प्रमाण अस्थिर होते.
– गरजेपेक्षा जास्त आणि सतत गरम पाणी पिण्यामुळे शरीरात रक्ताच्या मात्रेवर निश्चित आणि गंभीर असा परिणाम होतो. याचा परिणाम म्हणजे शरीरावर जास्त दबाव आल्याने हृदयाचे आजार होऊ शकतात.

४) इलेक्ट्रोलाईट्सच्या मात्रेवर प्रभाव पडतो.
– जास्त गरम पाणी प्यायल्याने रक्तात इलेक्ट्रोलाईट्सची मात्रा प्रभावित होते. जास्त गरम पाणी प्यायल्यामुळे शरीरातील पेशी पातळ होतात आणि रक्त व पेशींचा बॅलन्स बिघडतो. परिणामी पेशींमध्ये सूज येते आणि शरीराचे नुकसान होते.