Buttermilk
| |

नितळ कांतीसाठी ताजे ताक फायदेशीर; जाणून घ्या कसा कराल वापर

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दह्यापासून बनणारे ताक हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण फक्त शारीरिक फायद्यासाठी ताक आरोग्यदायी आहे हा समाज चुकीचा आहे. कारण ताकाचा वापर हा नितळ आणि तेजस्वी त्वचेसाठी अत्यंत लाभदायी आहे. आता तो कसा..? तर त्वचेच्या विविध आरोग्य समस्यांसाठी ताक फायदेशीर आहे असे त्वचारोग तज्ञ स्वतः सांगतात. याबद्दल सर्वात चांगली गोष्ट अशी कि, सर्व प्रकारच्या त्वचेसाठी ताकाचा वापर फायदेशीर आहे. कारण ताकामध्ये त्वचा साफ करणारे एन्झाइम असतात. जे त्वचा स्वच्छ, टोनिंग आणि मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. आता ताकाचे असे फायदे किती जणांना ठाऊक आहेत ते माहित नाही. पण हि माहिती वाचणाऱ्या तुम्हाला मात्र ताकाचे त्वचेसाठी होणारे फायदे नक्की जाणून घेता येतील. तर वेळ न घालवता लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० सनटॅन कमी करण्यासाठी त्वचेवर ताकाने मसाज करा. यामुळे सनटॅन लवकर बरा होता. यासाठी ताक आणि संत्र्याच्या सालीची पावडर मिक्स करून फेस पॅक बनवा आणि चेहऱ्याला लावा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील जुने डाग कमी होतात.

० मुलतानी माती, बेसन, मसूर डाळ यासारख्या पदार्थांमध्ये ताक मिसळून त्याची पेस्ट बनवा. हि पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने क्लीन करा.

० ताक तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देईल. यासाठी मुलतानी माती, हळद पावडर, अक्रोड पावडर आणि ताक एकत्र मिसळून एक्सफोलिएटिंग स्क्रबप्रमाणे चेहऱ्यावर वापरा.

० तसेच ताक, चंदन पावडर आणि चिमूटभर हळद यांचाही फेस क्लिन्जर बनवून वापरल्यास चेहरा सुंदर आणि त्वचा मऊ, चमकदार होईल.

त्वचेसाठी ताकाचे फायदे

१) ताक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट सारखे काम करते. यामुळे टॅनिंग, सनबर्न आणि उन्हापासून त्वचेचे नुकसान कमी होते.
२) त्वचेवरील मुरुम आणि जुन्यातले जुने डाग कमी होतात.
३) चेहऱ्यावरील उघडे छिद्र बंद होतात.
४) ताकामुळे त्वचा चमकदार आणि उजळ होते.