Frozen Green Peas
| |

फ्रोजन वाटाणे वेळ वाचवतील पण आरोग्याचं काय?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मटार हि अशी भाजी आहे अगदी लहानापासून वृद्धांपर्यंत जवळजवळ प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आवडीने खाते. त्यात हिवाळ्याचा हंगाम म्हणजे मटार खाण्याचा सिजनचं म्हणावे लागेल. कारण या दिवसात मटार बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतो. त्यामुळे साहजिकच घरात वारंवार मटार आणले जातात. मग हे साठवण्यासाठी घरातील बायका शेंगा सोलून त्यातील मटारचे दाणे एका हवाबंद डब्यात भरून फ्रिजरमध्ये ठेवून देतात आणि वाट्टेल तेव्हा वापरतात. याशिवाय विना हंगामाचा मटार खायचा असेल तर फ्रोजन मटार हा पर्याय सर्वांसाठीच लाभदायी आहे. तसेच हॉटेलमध्ये देखील बारमाही मटार पनीर, मटार पुलाव, मटार टिक्की असे पदार्थ मिळतातच. मग ते कुठून आणतात मटार? तर तेदेखील फ्रोजन मटारचाच वापर करतात. एकंदरच काय कि, फ्रोजन मटार आजच्या जिवनशैलीची गरज झाला आहे. पण हा मटार तुमच्या वेळेची बचत करताना आरोग्याचे नुकसान करत असतो हे तुमच्या लक्षात येत नाही.

आहार तज्ञ सांगतात कि, फ्रोजन मटारचे सेवन केल्याने आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे मटार फक्त थंडीच्या दिवसात येतात, म्हणून ते टिकवण्यासाठी आपण फ्रीझरमध्ये मटार ठेवतो आणि वर्षभर त्याचे सेवन करतो. मात्र असे करणे शरीरासाठी कोणत्याहीप्रकारे योग्य नाही. कारण शेंगांमधून काढलेले वाटाणे हे ताजे असतात त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. याउलट फ्रोजन मटारसाठवलेले असतात त्यामुळे यात सोडियमचे प्रमाण वाढू शकते. परिणामी त्यातील पोषक घटक कमी होतात आणि ते आरोग्यासाठी एकतर हानिकारक भूमिका वठवतात किंवा काहीच फायदा तोटा होत नाही.

० जाणून घ्या फ्रोजन मटार खाल्ल्याने शरीराचे काय नुकसान होते ते खालीलप्रमाणे:-

> ताज्या वाटाण्यांपेक्षा फ्रोजन वाटाण्यांमध्ये चवीची आणि पोषकतेची कमतरता असते. यामुळे हे मटार शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.

> फ्रोजन मटारमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. परिणामी फ्रोजन मॅटरमधील पोषकता कमी होते आणि याचा शरीराला कोणताही फायदा होत नाही.

> गोठवलेल्या पदार्थांच्या सेवनाने आपले वजन वाढू शकते. याचे कारण म्हणजे त्या पदार्थात वा भाजीत भरपूर फॅट्स आढळतात आणि फ्रोजन मटार अश्याच भाज्यांपैकी एक असल्यामुळे ते खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

> फ्रोजन पदार्थ नेहमी ताजे ठेवण्यासाठी यात स्टार्चचा वापर केला जातो. हॉटेलमध्ये मटारच्या हंगामाव्यतिरिक्त मटारचे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात स्टार्चचे प्रमाण वाढते. परिणामी आरोग्याचे नुकसान होते.

> मधुमेहाच्या रुग्णांसाठी फ्रोजन पदार्थ कोणत्याही स्वरूपात खाणे हानिकारकच ठरू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात फ्रोजन मटार खाणे टाळा.

> फ्रोजन पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे हृदयरोग्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणून हृदयाचे विकार असणाऱ्या रुग्णांनी फ्रोजन मटारचे सेवन करू नये.

> फ्रोजन पदार्थांमध्ये असलेल्या ट्रान्स फॅट्समुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वेगाने वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते. परिणामी हृदयाचे आरोग्य आणि पेशींचे आरोग्य देखील धोक्यात येते.