| | | |

फळ एक आणि फायदे अनेक; जाणून घ्या या जादुई फळाबद्दल

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दररोजची धावपळ, व्यग्र जीवनशैली यामुळे आपल्या आरोग्याची पुरती वाट लागते. कारण अवेळी झोप आणि अवेळी खाणेपिणे यामुळे आपण स्वतःच आजारांना जणू आमंत्रण देतो. मित्रांनो तुम्ही ‘ऍन ऍपल अ डे, किप्स डॉक्टर अवे ‘! (An Apple A Day Keeps The Doctor Away) ऐकला आहात का? याचा अर्थ असा कि, रोज एक सफरचंद डॉक्टरांना दूर ठेवते. अर्थात रोज एक सफरचंद खाल्ल्याने आपण आजारी पडत नाही आणि परिणामी डॉक्टरांकडे जावं लागत नाही. काय? काही समजतंय का? आपण ज्या जादुई फळाबद्दल आज जाणून घेणार आहोत ते जादुई फळ म्हणजेच सफरचंद. होय. डॉक्टर म्हणतात, जे आजार साधारणपणे दोन दशकांपूर्वी वृद्धांमध्ये आढळून दिसत होते ते आता तरुणांमध्ये त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. जसे कि, मधुमेह, हाडांची कमजोरी, थकवा आणि डोळ्यांच्या अनेक समस्या या सर्व तरुणांमध्ये दिसून येत आहेत. पण हे सर्व आजार दूर ठेवायचे असतील तर सफरचंद निश्चितच एक उत्तम पर्याय आहे.

सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारण सफरचंदात पेक्टिनसारखे फायदेशीर घटक आढळतात. याशिवाय दररोज सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. शिवाय सफरचंद पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोहने समृद्ध असते. यातील लोहामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता उद्भवत नाही. शिवाय आयुर्वेद सांगते कि, सफरचंद त्वचेचे आजार, चिडचिड, हृदयविकाराचा झटका, ताप, बद्धकोष्ठता यावर फायदेशीर आहे. तसेच सफरचंदामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडेंट, फायबर, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-बी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. चला तर जाणून घेऊयात सफरचंद खाण्याचे फायदे :-

१) कर्करोगाचा धोका कमी होतो – सफरचंदात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स शरीराला कर्करोगापासून संरक्षण देतात. अँटिऑक्सिडंट्सचे सेवन केल्याने, ज्यामुळे शरीरात कर्करोग होऊ शकतो असा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे कर्करोगावर प्रतिबंध मिळवणे सोपे जाते. सफरचंदमधील क्वरसिटीन पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वचविते. त्यामुळे कॅन्सरचा धोका साहजिकच कमी होतो. एका संशोधनानुसार, सफरचंद रोज खाणाऱ्या लोकांमध्ये फुफ्फुस, स्तन आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका कमी होण्याची शक्यता असते. दुसऱ्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की, सफरचंदात असलेले फायबर पोटाचा कॅन्सरवर प्रभावी असते.

२) मधुमेहासाठी फायदेशीर – मधुमेहींसाठी काय खावे आणि काय नाही हा एक मोठा प्रश्नच असतो. त्यामुळे फळे निवडणे अनेकदा कठीण असते. मात्र सफरचंद हे एक असे फळ आहे जे कोणत्याही आजाराने संक्रमित रुग्ण खाऊ शकते. तसेच मधुमेहाचे रुग्ण सफरचंदाचे सेवन करू शकतात. उलट मधुमेही रुग्णांसाठी हे फळ अत्यंत फायदेशीर ठरू शकते. एका संशोधनानुसार, जे लोक दररोज सफरचंद खातात त्यांना प्रकार -२ मधुमेहाचा धोका कमी असतो.

३) हृदयविकारावर उत्तम – सफरचंद हृदयरोगामध्ये खूप फायदेशीर मानले जाते. कारण तज्ञ सांगतात, सफरचंदात आढळणारे फायबर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. हे तेच कोलेस्टेरॉल आहे ज्याचे प्रमाण वाढल्याने हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. याशिवाय सफरचंदच्या सालीमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्स हृदयरोगामध्ये खूप फायदेशीर असते. त्यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांनी सफरचंद सोलून न घेता सालीसकट खाणे फायदेशीर ठरेल.

४) एनिमियापासून बचाव – सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असल्याने एनिमियासारख्या आजारावर ते रामबाण उपाय असल्याचे म्हटले जाते. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्या लोकांनी रोज २ ते ३ सफरचंद खाल्ल्यास शरीराची संपूर्ण दिवसाची लोहाची गरज पूर्ण होते.

५) पचनक्रियेसाठी मदतयुक्त – सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असते, जे पचनशक्ती वाढण्यास मदत करते. त्यामुळे सफरचंद जर त्याच्या सालीसह खाल्ले तर त्यामुळे खाल्लेले अन्न योग्यरीत्या पचण्यासाठी फायदा होतो. इतकेच नव्हे तर अपचनाचा त्रास उदभवत नाही.