|

फ्रिजमध्येही फळे होऊ शकतात खराब; कसे आणि कोणती ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा आपण सारेच आणलेली फळे खराब होऊन जातील या भीतीने त्यांना धुवून पुसून फ्रिजमध्ये ठेवून देतो. मात्र हे आपल्याला ठाऊक आहे का? काही भाज्या आणि मुख्य म्हणजे हंगामी फळे फ्रीजमध्ये ठेवणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार – आंबा, टरबूज, लीची आणि इतर हंगामी फळे फ्रिजमध्ये ठेवू नयेत. यामागे वैज्ञानिक कारण आहे.

कारण – आंबा आणि टरबूज या फळांचे सेवन प्रामुख्याने उन्हाळ्यात अधिक केले जाते. तज्ञांच्या मते, ही फळे कमी तापमानात ठेवल्याने लवकर खराब होऊ शकतात. तसेच ही फळे कापूनही फ्रिजमध्ये ठेवू नये. यामुळे या त्यांचा रंग फिका होतो. शिवाय त्याच्या पृष्ठभागावर बॅक्टेरिया वाढू लागतात.
यात कोणकोणत्या फळांचा समावेश होतो हे जाणून घ्या पुढीलप्रमाणे:-

१) केळी – केळ हे एक पूर्ण पोषक फळं आहे. काही जण तर या फळाला सुपरफूड देखील म्हणतात. मुख्य बाब अशी कि केळी कोणत्याही हंगामात सहजोगत्या उपलब्ध होणारे फळ आहे. मात्र या फळाला खराब होण्याच्या भीतीने कधीही फ्रिजमध्ये ठेऊ नये. एकतर केली पूर्ण काळी पडतात आणि दुसरे कारण म्हणजे यामधून ईथाइलीन नावाचा गॅस बाहेर जातो जो इतर फळांनाही पूर्णपणे खराब करतो.

२) रेड लिची – लिची हे फळ एकतर सालीसकट किंवा सालीविना खाल्ले जाते. या फळात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. या भीतीने अनेकदा हे फळ अनेकांच्या फ्रिजमध्ये आढळून येते. मात्र लिचीला फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्याचे वरील आवरण तर अगदी टवटवीत दिसते मात्र आतून फळ पूर्णतः खराब होऊन जाते.

३) लिंबू – लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असते. यामुळे लिंबू कमी तापमानात ठेवले असता त्याच्या सालावर डाग येतात आणि अशी डागाळलेली लिंब आहारात वापरणे आरोग्यास हानिकारक असते.

४) संत्र – तसे पाहता संत्र आपण १ – ३ दिवसांकरिता फ्रिजमध्ये ठेवू शकतो. मात्र संत्र्याचा मुळात गुणधर्म आंबट असतो आणि आंबट फळांना जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेऊ नये. या फळांना जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांच्या सालावर काळे डाग येतात आणि फळ आतून खराब होऊ लागते.

लक्षात ठेवा :- अनेकदा आपल्या घरात हंगामी फळांचा साठा जास्त असतो. जसे कि आंबा. अशी फळ फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होतात. मग हि फळे ताजी ठेवण्यासाठी काही काळ खोलीच्या तापमानानुसार थंड पाण्यात ठेवा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *