पायाच्या नखांना बुरशी लागलीय; ‘अशी’ घ्या काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन : आपल्या शरीरातील कोणताही अवयव मग तो छोटा असो वा मोठा जोपर्यंत स्वस्थ असतो आणि त्याच्या कार्यात कुठेही बाधा येत नसते तोपर्यंत शरीरात कोणत्याही व्याधी निर्माण होत नसतात. मात्र काही वेळा अगदी बारीकसारीक दुखणीही कमालीची वेदनादायक ठरतात. आपल्या बहुतेक सर्व काममाध्ये हाताची बोटे आपण वापरत असतो. अनेकवेळा या बोटांच्या नखांना इजा होतात आणि त्यात पाणी जाऊन पू होतो आणि मग बोटांना ठणका लागतो. त्यावेळी हे उपाय करून पाहावेत.

पायाची नखे आपोआप तुटत किंवा त्यांचा रंग बदलत असल्यास त्याकडे तातडीने काळजी घेण्याची गरज आहे, कारण त्यातून दुर्धर आजार निर्माण होण्याची भीती आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नखांना वेदना होत असल्यास ती बुरशी-संसर्गाची लक्षणे असल्याचे समोर आले आहे. सध्या वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक चार जणांमागे तिघांना आणि युवा गटामध्ये प्रत्येक पाच लोकांमागे एकाला नखांच्या बुरशीचा त्रास होण्याचा संभव आहे. बुरशीचा संसर्ग हाताच्या बोटांनाही होऊ शकतो, मात्र बहुतांशी संसर्ग पायाच्या बोटांवरच आढळतो. दलदल, पाणथळ अशा ठिकाणी सातत्याने फिरणे, तलावामध्ये दीर्घकाळ पोहणे, ओले आणि दलदलीत वापरलेले बूट सातत्याने वापरणे, अंगठय़ाच्या नखाशी जखम होणे आदी कारणांमुळे हा संसर्ग होत आहे. असा संसर्ग झाल्यास तेथे पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात आणि नंतर ते तपकिरी, पिवळे होऊ लागतात. नखे कधी अतिशय घट्ट अथवा पातळ, ठिसूळ होतात.

ज्यांना ‘टाइप टू’ मधुमेह असेल त्यांनी नखांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह झालेल्या रुग्णांच्या नखांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. संसर्गाचे प्रमाण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास अवयव कापण्यापर्यंत वेळ येते. नखांच्या बुरशीची काही वेगळी लक्षणेही आहेत. त्यामध्ये इनग्रोन टोनेल्स म्हणजे पायाची नखे आतमधील बाजूला वाढलेली असणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. दोन्ही बाजूंच्या कडा आणि टोक आतमध्ये गेलेले असल्याने त्वचा दुखू लागते. मोलानोमा हा अत्यंत दुर्मीळ असा त्वचेचा कर्करोग असतो, त्यामुळे नखाच्या आतील बाजूला काळसर दिसू लागते त्यामुळ नखांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नखांना बुरशीचा संसर्ग झाल्याची शंका आल्यास तातडीने शल्यविशारदांना ते दाखवून घेणे आवश्यक आहे. यात कालापव्यय झाल्यास त्रास वाढू शकतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी पाय नेहमीच कोरडे आणि स्वच्छ ठेवण्याची नितांत गरज आहे.

अनेकांची नखं धूळ, मातीत न राहतादेखील काळवंडलेली दिसतात.

प्रामुख्याने धावपटूंमध्ये ही समस्या आढळते. पण वरवर पाहता साधी वाटणारी ही समस्या अनेक गंभीर समस्यांचे संकेत देते. मग अशी काळवंडलेली नखं कोणत्या समस्यांमधील एक लक्षण आहे याकरिता हा एक्सपर्ट सल्ला नक्की जाणून घ्या.

अवजड वस्तू पायावर पडणं –

एखाद्या अपघातामध्ये किंवा अनावधानाने एखादी जड वस्तू पायावर पडल्यास नखांखालील नसांचे नुकसान होते. नसा फाटल्यास रक्त साखळते. परिणामी नखांचा रंग बदलतो. यामध्ये वेदना जाणवतात. नखाजवळील अशा प्रकारचा रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

पुन्हा पुन्हा त्रास जाणवणं –

लांब धावण्यासाठी फीटेट फूटवेअरचा वापर केल्यास त्याचा त्रास पायांना आणि नखांजवळील भागाला होतो. त्यामुळे खूप घट्ट शूज वापरू नका. सौम्य प्रकारच्या दुखण्यांमध्ये नख  वाढतात आणि काळसर भाग काढून टाकता येतो. मात्र त्रास खूपच जास्त असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वैद्यकीय उपचारांच्या मदतीने डेड नेल संपूर्णपणे काढून टाकता येते. काळवंडलेल्या नखाजवळील त्वचादेखील लालसर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

स्कीन कॅन्सर –

एक गंभीर प्रकारचा स्कीन कॅन्सर हा नखांखालीच वाढतो. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. Melanoma या स्कीन कॅन्सरच्या प्रकारामध्ये वेदना फारशा जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकदा दुर्लक्ष होते. नखांच्या पलिकडे क्युटिकल्समध्येही त्वचेचा रंग बदललेला असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.

फंगल टो नेल इंफेक्शन –

नखांना होणाऱ्या इंफेक्शनमुळे त्यांचा रंग बदलण्याचा धोकाही वाढतो. नखांचा रंग निळा, पिवळा, हिरवा किंवा काळासर वाटत असेल त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. फंगल इंफेक्शनच्या तीव्रतेवरून पुढील उपचार ठरवले जातात. सौम्य स्वरूप असल्यास केवळ टॉपिकल औषधांनी त्यांना पूर्व वत केले जाते. तर स्वरूप गंभीर असल्यास काही औषध आणि लेझर ट्रीटमेंट केली जाते.

नखुरडे- बर्याचवेळा नखुरडे झाल्याने बोटाला ठणका लागतो. यातही बोटाला चिकटपट्टी घट्ट बांधल्यास नखुरडे लवकर फुटते. दुसरा उपाय म्हणजे शेंदूर व अंड्याचा पांढरा बलक खलून लावल्याने आराम पडतो. शेंदूर हा अँटीसेप्टिक म्हणून काम करतो. हाताच्या बोटांची तसेच पायाच्या बोटांची नखे वेळच्यावेळी कापणे, त्यात अडकलेली घाण वेळच्यावेळी काढणे हे एकंदर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. वय वाढत जाईल तसा नखांचा कडकपणा वाढत जातो. वृद्ध वयात तर नखे कापणेही अवघड जाते. अशावेळी पाण्यात बोरीक पावडर टाकून पाय थोडा वेळ बुडवून ठेवावेत व मग नेलकटरच्या साहाय्याने नखे कापावीत. आंघोळ झाल्यानंतरही नखे गर पाण्यामुळे मऊ पडलेली असतात. त्यावेळी ती काढावीत. तसेच नखे कापताना अगदी त्वचेजवळ कापू नयेत. त्यामुळे जिव्हाळे लागण्याचा संभव कमी होतो.