| | | |

अळीवाचे पदार्थ खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अळीव म्हणजे काय? तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो या पदार्थाला बहुतांशी भागामध्ये हलीम किंवा हळीव या नावाने ओळखले जाते. तर अळीवला इंग्रजीमध्ये गार्डन क्रेस सीड्स असे म्हणतात. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. लोह, फॉलेट, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन E, फायबर आणि प्रोटीनसह अनेक पोषकघटक अळीवमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय अळीवपासून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय उत्कृष्ट असतात. प्रामुख्याने अळीवपासून लाडू, खीर आणि चिवडा असे पदार्थ बनवले जातात. बाळंतीण महिलेला अळीवाचे पदार्थ आग्रहाने खायला दिले जातात. कारण यातील अनेको पोषक घटक बाळंतीण महिलेच्या आरोग्यासाठी अतिशय फलदायी आहे. परिणामी नवजात शिशुलाही याचा लाभ होतो. चला तर जाणून घेऊयात अळीवाचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) हिमोग्लोबिन वाढते – अळीवमध्ये मुबलक प्रमाणात लोह (आयर्न) असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबिन कमी असल्यास किंवा ऍनिमिया सारखे आजार होतात. यासाठी १ चमचा अळीव दररोजच्या आहारात समाविष्ट करा.

२) दम्यापासून आराम – फुफ्फुसांच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि दम्याचा त्रास कमी होण्यासाठी अळीव खा. कारण यामध्ये जुनाट खोकला आणि घसादुखी कमी होते.

३) कॅसरला रोख – अळीवच्या अँटी-कैंसर गुणांमुळे आणि अँटी-ऑक्सिडंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते.

४) मासिक पाळीच्या तक्रारी दूर – अनियमित मासिक पाळी असल्यास अळीव खा. अळीवमध्ये असणारे phytochemicals हे इस्ट्रोजेन हार्मोन्ससाठी फायदेशीर ठरतात त्यामुळे मासिक पाळी नियमित होते.

५) बाळंतिणीला उपयुक्त – अळीवमध्ये असणारी प्रोटीन, लोह यासारखी पोषकतत्वे बाळंतिणीला पुरेसे दूध येण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळेच आपल्याकडे स्तनपान करणाऱ्या बाळंतिणीला अळीवाचे लाडू, अळीवाची खीर खाण्यास दिली जाते.

६) पोट साफ होते – अळीवमधील फायबर्समुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन यासारखा त्रास असल्यास अळीव खाणे उपयुक्त ठरते.

७) वजन नियंत्रणात राहते – दररोज सकाळी उपाशीपोटी चमचाभर हाळीव कोमट पाण्यातून खाल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

८) स्मरणशक्तीत वाढ होते – हळीवमध्ये असणाऱ्या linolenic acids आणि arachidonic fatty acids या पोषक घटकांमुळे स्मरणशक्ती वाढण्यास खूप चांगली मदत होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *