Garlic Benefits
|

Garlic Benefits : लसणाचे आहेत जबरदस्त फायदे; आजपासून रोज एक पाकळी खाल्ल्यास दूर होतील सर्व आजार

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये व आहारशास्त्रांमध्ये असे अनेक पदार्थ आहेत ज्यांचे जर आपण सेवन केले तर आपल्या शरीरातील गंभीर आजार लवकरच दूर होऊ शकतील परंतु या पदार्थांचे आपल्याला फारसे ज्ञान नसते म्हणूनच आपल्याला आजूबाजूला असणाऱ्या अनेक पदार्थांचा लाभ देखील घेता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका पदार्थाबद्दल सांगणार आहोत, हा पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये व आहार शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. या पदार्थाशिवाय जेवण अपूर्ण मानले गेले आहे. हा पदार्थ जेवणाला फोडणी देण्यासाठी हमखास वापरला जातो. या पदार्थाचे नाव आहे लसूण. दैनंदिन जीवन जगत असताना पदार्थाला चव देण्यासाठी आपण फोडणी देत असतो. या फोडणीमध्ये लसूणचा समावेश अवश्य केला जातो परंतु अन्नपदार्थांना चव देण्याव्यक्तीरीक्त देखील लसूणाचे अनेक फायदे शरीराला आहेत. हे अनेकांना माहिती नसेल. जर तुम्हाला देखील लसूण खाण्याचे फायदे (Garlic Benefits) माहिती नसतील तर आजचा हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

हल्ली धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास विसरून गेलेला आहे. वेळेवर दोन घासदेखील मनुष्य खात नाही, अशावेळी शरीरामध्ये अनेक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. जर तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमजोर झालेली असेल वारंवार तुम्ही आजारी पडत असाल तर दररोज एक पाकळी लसूण खाणे तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकते. लसूण मध्ये झिंक, सेलेनियम, विटामिन सी विटामिन बी सिक्स आणि सल्फर यासारखे पोषक तत्व उपलब्ध असतात. तुमच्या शरीराला संरक्षण कवच प्रदान करण्याचे कार्य लसूण करते.

लसूण मध्ये जीवनसत्व, खनिजे भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळतात तसेच आयोडीन, गंधक, असे उग्र वासाचे घटक देखील उपलब्ध असतात. नियमितपणे लसूण सेवन केल्याने आपल्या शरीरातील बी कॉम्प्लेक्स चे प्रमाण वाढते.

जर तुम्ही अन्नपदार्थाला फोडणी देताना लसूण पेस्ट वापरत असाल तर उत्तम परंतु कच्चा लसूण खाणे देखील आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरू शकतो. आता आपण लसूण खाण्याचे नेमके शरीराला काय काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

रक्तदाब राहते नियंत्रणात- Garlic Benefits

जर तुम्हाला वारंवार हाय ब्लड प्रेशर, मानसिक तणाव सतावत असेल तर तुमच्या शरीरामध्ये कमी होणारा ब्लडप्रेशर व हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्याचे कार्य लसूण करते. लसूण मध्ये जे घटक असते ते तुमच्या ब्लड प्रेशर ला नियंत्रण करते आणि म्हणूनच तुमच्या शरीराचे संतुलन योग्य राहते. ब्लड प्रेशर निमित्त तुम्हाला जर वारंवार गोळ्या खाव्या लागत असतील तर दिवसभरातून एक लसणाची पाकळी अवश्य पाहून पहा. तुमच्या गोळ्या काही दिवसांनी सेवन करणे बंद होऊन जातील.

हृदयरोग दूर करते

हल्ली मानसिक तणाव, धावपळीचे जीवन, आहार शैली यावर झालेले परिणाम यामुळे हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. लसूण मध्ये आलीसीन व विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळते. हे घटक हृदयरोग दूर करण्यासाठी कारणीभूत ठरतात. नियमितपणे लसूण चा उपयोग केल्याने (Garlic Benefits) तुमच्या शरीरातील हृदयातील व धमनेतील कॉलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी होते, परिणामी रक्तप्रवाह सुरळीत होतो. हृदयातील नसांचे रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडल्याने हार्ट मध्ये ब्लॉकेज देखील निर्माण होत नाही व भविष्यात हृदयरोगाचा धोका टळतो.

रोग प्रतिकारक शक्ती वाढते

लॉकडाऊन नंतर अनेकांना वेगवेगळे आजार प्रामुख्याने होताना दिसून येत आहेत यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणे, वारंवार आजारी पडणे अशा घटना समोर येत आहे. जर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाली असेल तर अशावेळी लसूण खाणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. लसूण मध्ये अँटी बॅक्टेरियल घटक असतात, जे तुमच्या शरीराला अंतर्गत व बाहेरून संरक्षण कवच प्रदान करतात. नियमितपणे एक पाकळी लसूण सेवन केल्याने तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती सुधारते.

खोकला व श्वसन रोगावर रामबाण औषध

वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर सर्दी, खोकला श्वसनाचे अनेक आजार अनेकांना उद्भवताना दिसून येत आहे, अशावेळी वायरल इन्फेक्शन पासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर एक पाकळी लसूण सेवन करणे आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते. लसूण खण्याचेवफायदे इतके आहेत की जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, दमा खोकल, क्षयरोग या सर्व आजारांवर मात करण्यासाठी लसूण रामबाण औषध मानले जाते. क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसूण दुधामध्ये उकळून रुग्णांना सेवन करायला दिले जाते, असे केल्याने छाती मोकळी देखील होते व खोकल्याचे प्रमाण कमी होते.

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते

जर तुम्ही नियमितपणे एक पाकळी लसूणाची सेवन केली तर तुमच्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक आहेत ते दूर होण्यासाठी मदत होते म्हणूनच अँटिऑक्सिडंट म्हणून लसूण उपयुक्त ठरत असतो. जर तुम्हाला वारंवार जर शीत पित्त, अंगावर लाल चट्टे, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर व कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर अशावेळी नियमितपणे एक लसूणची पाकळी सेवन करा (Garlic Benefits) यामुळे शरीरामधील जे काही विषारी घटक आहे व घाण जमा झालेली आहे ती पूर्णपणे बाहेर निघून जाईल व तुमचे शरीर निरोगी राहील.