Tuesday, March 28, 2023

निरोगी आरोग्यासाठी फक्त १ कप पेरूचा चहा; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो पाण्याचा, दुधाचा, आल्याचा, मसाल्याचा आणि अजून कश्याकश्याचा चहा तुम्ही प्यायला असाल. पण कधी पेरूचा चहा प्यायला आहात का? नाही? अहो मग चहा पिण्याचा फायदा तो काय? असे म्हणण्याचे कारण असे कि, पेरूचा चहा हा चवीला उत्कृष्ट आणि तब्येतीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण मुळातच पेरूमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. नुसते फळ नव्हे तर पेरूची पानेदेखील अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यातील औषधी गुणधर्मांमुळे अनेक ठिकाणी पेरूची पाने चहा बनविण्यासाठी वापरली जातात. पेरूच्या पानांपासून बनवलेला चहा हर्बल टी म्हणून ओळखला जातो

पेरूच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात पण ते कोणते?
– पेरूच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि क्वेरसेटिकसह इतर पोषक तत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे पेरूच्या पानांपासून बनविलेल्या चहाची लोकप्रियता वाढते. यावर विश्वास ठेवा की आपल्याला हे आरोग्यविषयक फायद्यांविषयी देखील जाणून आश्चर्य वाटेल. चला तर मग आपण सांगू, पेरूच्या पानांपासून बनवलेल्या चहाच्या काही जबरदस्त फायद्यांबद्दल-

० पेरू चहा कसा बनवायचा?
– पेरूचा चहा बनविणे फार काही कठीण नाही आहे. अगदी नेहमीच साचहसारखाच हा चहा बनवायचा असतो. यासाठी आपल्याला खालील साहित्य आणि कृतीचा अवलंब करावा लागेल.

*साहित्य – ८ ते १० पेरूची ताजी पाने, १/२ चमचा सामान्य चहाची पाने, १ १/२ कप पाणी आणि १ चमचा मध.

*कृती – प्रथम पेरुची ताजी पाने पूर्णपणे धुवा. सॉसपॅन घ्या आणि साधारण उष्णतेवर २ मिनिटे उकळण्यासाठी त्यात पाणी घाला. आता धुतलेल्या पेरूची पाने घाला आणि चहाच्या रंगासाठी सामान्य चहाची पाने घाला. आता १० मिनिटे शिजवा. शेवटी गोडपणासाठी मध घाला. झाला तुमचा पेरूचा चहा तयार आहे.

० फायदे –

१) पोटाच्या समस्यांवर प्रभावी – पेरूच्या पानांपासून बनविलेला चहा वायू, बद्धकोष्ठता आणि पोटात गोळा येणे अशा आजारांवर रामबाण उपाय आहे. यामुळे दररोज पेरूचा चहा प्याल तर पोटातील अनेक आजारांपासून सुटका मिळेल. हा चहा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतो. शिवाय शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकून पोटही थंड करतो.

२) कमी कोलेस्टेरॉल – शरीरात कोलेस्टेरॉल जास्त असल्यास अनेक आरोग्यविषयक समस्या उदभवतात. यावर पेरूचा चहा पिणे फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार, पेरूच्या चहामूळे कोलेस्टेरॉलची पातळी बर्‍याच प्रमाणात कमी होते. यामुळे पेरूचा चहा दररोज प्यायल्याने हृदयविकाराचा झटका, हार्ट स्ट्रोक आणि एथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी होतो. वास्तविक, कोलेस्ट्रॉल शरीरात रक्त परिसंचरणात अडथळा आणते. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

३) मधुमेहापासून मुक्तता – पेरूच्या पानांपासून बनवलेला चहा मधुमेहाची समस्या दूर करतो. प्रामुख्याने प्रकार २ मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांनी पेरुच्या पानांपासून बनवलेला चहा नक्कीच प्यावा. रिकाम्या पोटी पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने साखरेची पातळी नियंत्रित होते आणि मधुमेहाच्या त्रासापाऊण आपली सुटका होते.

४) मुरुमांच्या समस्येपासून आराम – पेरूच्या पानांमधे असलेले औषधी घटक आपल्या शरीरातील रक्त शुद्ध आणि स्वच्छ करतात. तसेच चेहऱ्यावर मुरुम आणि चट्टे होण्याची सर्वात सामान्य कारणे म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ आणि पेरूची पाने हे, विष रक्तातून काढतात. ज्यामुळे चेहर्‍यावरील डाग व मुरुम सुटतात. दिवसातून एकदा पेरूच्या पानांचा बनलेला चहा प्यायल्याने मुरुमांच्या समस्येतून आराम मिळतो.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...