| |

दीर्घ पाठदुखीपासून मिनिटांत मिळवा आराम; जाणून घ्या उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ऑफिसमध्ये बराचवेळ बसून काम करणे किंवा दगदगीचा प्रवास यामुळे पाठदुखीचा त्रास होतो. मुख्य म्हणजे, पाठदुखीमुळे उठताना- बसताना अगदी झोपताना देखील पाठीत कळ जाते. यामुळे जाड सामान उचलणे असेल किंवा काम भराभर आवरणे असेल दोन्हीही शक्य होत नाही. कधीकधी ही वेदना इतकी तीव्र असते की व्यवस्थित उभेदेखील राहता येत नाही. त्यामुळे पाठदुखीवर वेळीच उपाय करणे आवश्यक असते. बराच काळ या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास हि समस्या गंभीर स्वरूप धारण करते. म्हणूनच आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत ज्यांच्या साहाय्याने पाठदुखी अगदी मिनिटांत दूर होईल.

० पाठदुखीपासून मुक्त करणारे उपाय खालीलप्रमाणे:-

१) तुळशीची पाने – तुळशीची पाने मधासोबत हातावर चोळून खाल्ल्याने पाठदुखीपासून लवकर आराम मिळतो. शास्त्रानुसार तुळशीची ८-१० पाने बारीक करून त्यात मध घालून हे मिश्रण खा. हे मिश्रण दररोज ३वेळा खा. यामुळे पाठदुखी कमी होईलच शिवाय रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढेल. हे मिश्रण खाण्याबरोबरच तुळशीच्या तेलाने कमरेला मालिश करणेदेखील पाठदुखीवर परिणामकारक आहे.

२) ऑइल मालिश – पाठदुखीच्या त्रासावर तेल मालिश फायदेशीर ठरते. यासाठी भृंगराज तेल गरम करून पाठीची मालिश करा. दिवसातून २वेळा हे तेल कमरेवर लावा. या तेलाने दररोज मालिश केल्यास पाठदुखी गायब होईल. याशिवाय मोहरीच्या तेलानेही मालिश केल्यास फायदा मिळेल. यासाठी मोहरीचे तेल चांगले गरम करून त्यात लसूण घाला आणि या तेलाने १५ मिनिटांपर्यंत कमरेवर मसाज करा.

३) मीठ – मीठाने शेक घेतल्यास पाठदुखीपासून मुक्ती मिळते. त्यामुळे पाठदुखीची तक्रार असेल तर काळे मीठ गरम करा आणि नंतर हे मीठ एका कपड्यात बांधून वेदनादायक ठिकाणी शेका. यासाठी काळ्या मिठाचा वापर केल्याने आराम मिळेल.

० लक्षात ठेवा!

१) झोपताना चुकीच्या पद्धतिएन झोपल्यामुळे कंबरदुखी आणि पाठदुखीचे समस्या होते. यामुळे झोपताना व्यवस्थित झोपावे. तसेच झोपेसाठी चांगली गादी आणि आरामदायक उशा वापराव्यात.

२) व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले आहे. पण अतिउत्साही व्यायाम पाठदुखीची तक्रार होण्यास कारणीभूत ठरतो.

३) ज्या लोकांना पाठदुखीचा त्रास होतो. त्या लोकांनी अवजड सामान वाहून नेणे टाळावे. कारण यामुळे स्नायूंवर ताण येतो आणि पाठदुखीचा त्रास वाढतो.

४) जास्त वेळ एकाच ठिकाणी बसू नका. कार्यालयात काम करताना, दर २० मिनिटांनी आपल्या खुर्चीवरुन उठून थोडासा फिरा. असे केल्याने कमरवर दबाव येत नाही.