| |

या सवयींची वेळीच साथ सोडा आणि मेंदूचे आरोग्य जपा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामाची गरज असते. तसेच मेंदूचे आरोग्य राखले तर साहजिकच आपली कार्यप्रणाली सुरळीत चालते. याकरिता मेंदूचा योग्य पद्धतीने विकास व्हावा म्हणून आपण काळजी घेणे गरजेचे आहे. चांगले विचार, सकारात्मक वातावरण, वाचन, संगीत ऐकणे यामुळे मेंदूला आराम आणि चालना मिळते. परंतु दगदगीच्या जीवनात आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळतही नाही आणि आपण काढताही नाही. मुख्य बाब म्हणजेच हेच आपल्या आरोग्याचा घात करणारे मुख्य कारण आहे. कारण काही सवयी मेंदू्च्या कार्यात अडचणी निर्माण करतात. आता या सवयी कोणत्या हे आपल्याला माहित असेल तर आपण वेळीच बदलू शकतो. म्हणूनच आज आपण या सवयीनविषयी जाणून घेणार आहोत. यांपैकी एक जरी सवय तुम्हाला असेल तर वेळीच सोपा आणि मेंदूचे रक्षण करा.

१) दैनंदिन आहारात अधिक साखर खाणे
– आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अगदी शरीरावरच नाही तर मानसिकतेवर देखील आपल्या आहारातील पदार्थ परिणाम करीत असतात. एका संशोधनानुसार, जे लोक दैनंदिन आहारात खूप साखर किंवा साखरेचे पदार्थ खातात त्यांच्या मेंदूवर याचा हळूहळू परिणाम दिसू लागतो. ज्यामुळे पुढे मानसिक समस्या निर्माण होतात. म्हणूनच आहारात साखरेचे सेवन नियंत्रित करा.

२) सकाळचा नाश्ता टाळणे – सकाळचा नाश्ता आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील अत्यंत महत्वाचा भाग असल्यामुळे तो बिलकुल टाळू नका. कारण यामुळेदेखील मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. रात्रभर कमीत कमी ८ तास आपण उपाशी असतो. ज्यामुळे सकाळी उठल्यावर पचनाच्या समस्या निर्माण होतात. यामुळे दिवसभर अॅसिडिटी होऊ नये यासाठी सकाळी उठल्यावर चांगला अर्थात पोषक आणि पॉट भरेल इतका नाश्ता प्रत्येकाने करायलाच हवा.

३) अपुरी झोप घेणे – काही लोक खूप वेळ झोपतात पण रात्री कधीच वेळेवर झोपत नाहीत. तर काहीजण उशीरा झोपतात आणि लवकर उठतात. यामुळे साहजिकच झोप पूर्ण होत नाही. मग अश्या अपूऱ्या झोपेमूळे मेंदू अस्वस्थ होतो. कारण गाढ झोपेतच मेंदूला काही काळ आराम मिळतो. इतर वेळी सतत विचार करण्यामुळे मेंदू कार्यरत असतो. यासाठी दिवसभरात कमीत कमी ७-८ तास शांत झोप घ्या.

४) अती विचार व चिंता करणे – जागी सर्व सुखी असा कोण आहे? असे म्हणण्याचे कारण म्हणजे आजकाल प्रत्येक वयोगातील व्यक्तीला ताणतणावाला सामोरे जावेच लागते. मात्र सतत विनाकारण चिंता आणि काळजी करण्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यात एकदा का मानसिक आरोग्य बिघडले की शारीरिक प्रकृती खराब होण्यास वेळ लागत नाही. यासाठी ताणतणावावर वेळीच उपाययोजना करा.