| |

आल्याचे सेवन आरोग्यासाठी अतिशय लाभदायक; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळा आला कि सोबत सर्दी ,पडसं, ताप आणि खोकला अश्या आजारांना बळ येते. मग साहजिकच डॉक्टर वारी सुरु होते. पण जर आपण स्वतःच आपल्या आरोग्याची काळजी अगदी सध्या आणि सोप्प्या उपायांनी घेऊ शकत असलो तर..? होय आपण आपली रोग प्रतिकारक क्षमता घरगुती उपायांनी बळकट करू शकतो ते हि आल्याच्या साहाय्याने. आल्याचा पदार्थांमध्ये चव आणण्यासाठी फायदा होतो हे आपण जाणतोच. पण आलं पचनक्रिया चांगली करण्यासाठीही उपयोगी आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त आलं तुम्हाला अन्य कोणत्या गोष्टींमध्ये फायदेशीर आहे हे जाणून घ्या. खालीलप्रमाणे :-

१) थकवा दूर करण्यासाठी – अधिक कामामुळे शारीरिक थकवा जाणवतो. याचा परिणाम दिनचर्येवर होतो. यावर सर्वोत्तम नैसर्सिक उपाय म्हणजे आलं. जर तुम्हाला मळमळ होत असेल तर आलं त्यावर फायदेशीर ठरतं. याकरिता आल्याचा चहा किंवा आलेपाक, आल्याचा रस याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

२) कॅन्सर रुग्णांसाठी उपयुक्त – ज्यांना कॅन्सर आहे अशा रूग्णांना केमिओथेरपी चालू असताना नॉशिया (सकाळी उठतेवेळी शारीरिक थकवा जाणवणे) घालवण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. अशा वेळी त्यांना आल्याची वडी किंवा आल्याचा चहा तुम्ही देऊ शकता. गर्भाशय, प्रोस्टेट कॅन्सरच्या वाढीला थांबवण्यासाठी याचा उपयोग होतो. कॅन्सरची वाढ आल्याच्या नियमित सेवनाने थांबते.

३) रोगप्रतिकारक क्षमतेस फायदेशीर – आपली रोग प्रतिकारक्षमता उत्तम कार्यरत असेल तर रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. यासाठी २०० ग्राम आलं, ३०० ग्राम साखर, २ चमचे साजूक तूप, १० वेलची, २ चमचे दूध घ्या. सर्वप्रथम आलं मिक्सरमध्ये दूध घालून वाटून घ्या. नंतर एका पॅनमध्ये १ चमचा तुपावर हि पेस्ट ५ मिनिटे परता. यामध्ये साखर, वेलची पूड घालून त्याला एका ताटलीत बटर पेपरवर तुपाचा हात लावून घेत पसरवा. हे मिश्रण थंड झाल्यावर सुरीने वडी कापून घ्या. हि आल्याची वडी अर्थात आलेपाक दररोज एक खाल्ली असता आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते.

४) फंगल इन्फेक्शनपासून सुरक्षा – त्वचेवरील फंगस इन्फेक्शन कमी करण्यासाठी लागणारे सर्व गुणधर्म आल्यामध्ये असतात. एका वैज्ञानिकाच्या अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की, साधारण २९ अँटिफंगल मसाल्याच्या झाडांमधून आल्याच्या झाडात जास्त अँटिफंगल गुणधर्म असतात.

५) अल्सरपासून आराम – पोटाचा अल्सर हा अतिशय त्रासदायक आजार आहे. फटिग येणं, जळजळ होणं आणि सतत मळमळत राहणं ही याची लक्षणं आहेत. पण आल्याची पावडर यावर गुणकारी उपाय आहे. यामध्ये असणारे इन्फ्लेमेटरी प्रोटीन्स पोटाच्या अल्सरची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरतात.