Exercise to lose weight
|

वजन कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स एकदा वापरुन पहाच! लगेचंच जाणवेल परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेकजण हे आपल्या वजनाच्या बाबतीत फार काळजीवाहू असतात . आपले वजन वाढले कि नाही याचे प्रमाण ते दररोज चेक करतात . पण सतत वजन चेक केल्याने ते कधीही वाढत नाही किंवा ते कमी सुद्धा होत नाही. त्यामुळे दररोज वजन पाहून टेन्शन घेण्यापेक्षा त्याच्यावर कृती करणे जास्त आवश्यक असते वजन कमी करण्यासाठी काही प्रमाणात प्लॅन पण करणे आवश्यक आहे . आपले वजन कमी करण्यासाठी कश्या पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया ….

— सकाळी लवकर उठून नियमित व्यायाम आणि योगासने करावित.

— वजन कमी करायचे असल्यास कमीत कमी दररोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा.

— दररोज काही प्रमाणात चालले गेले पाहिजे

— चालण्याचा व्यायाम, पळण्याचा व्यायाम तसेचं सायकलिंग, पोहणे, जिन्याच्या पायऱ्या चढणे-उतरणे यासारखे व्यायाम करावेत.

— आठवड्यातून किमान 4 ते 5 दिवसतरी व्यायाम करणे आवश्यक.

— व्यायाम सुरु करताना सुरवातीस कमी प्रमाणात करुन दररोज थोडा-थोडा व्यायाम वाढवत जावा. एकाच दिवशी जास्त प्रमाणात व्यायाम करु नये.
— तेलकट पदार्थ, तुपाचे पदार्थ, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकारी प्रोडक्ट, चिप्स, चॉकलेट्स, जंकफूड, फास्टफूड खाऊ नयेत.
जास्त कर्बोदके असणाऱ्या पदार्थांपासून दूर रहा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते. अश्या पदार्थांपासून दूर राहा