| | | |

हिरवी मिरची खाणाऱ्याला संसर्गाची भिती काय?; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन आहारात आपण कितीतरी असे पदार्थ बनवत असतो जे बनविताना यात हिरव्या मिरचीचा समावेश केला जातो. चवीला तिखट पण आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या मिरचीचे फायदे आपल्यापैकी किती जणांना ठाउक आहेत? अनेक लोक हिरवी मिरची खाणे टाळतात. तर या लोकांना आम्ही सांगू इच्छितो कि अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी हिरवी मिरची उपयुक्त आहे. अगदी वजन कमी करण्यापासून ते शरीरातील रक्ताभिसरणाला गती देण्यापर्यंत हिरवी मिरची कार्यरत असते. हिरव्या मिरचीत व्हिटॅमिन ए, बी6, सी, लोह, तांबे, पोटॅशियम, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय बीटा कॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन-झेक्सॅन्थिन इत्यादी आरोग्यदायी गोष्टी आहेत. यामुळे हिरवी मिरची खाणाऱ्यांना कोणताही संसर्गजन्य रोग आणि अगदी मोठ्यातला मोठा आजार होत नाही. चला तर जाणून घेऊयात हिरव्या मिरचीचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोग प्रतिकारक शक्तीत वाढ – रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हिरव्या मिरचीचे सेवन करावे. कारण हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे हिरवी मिरची खाल्ल्यास आपल्या शरीराला बॅक्टेरियापासून संरक्षण मिळते. म्हणूनच दररोज फक्त १ हिरवी मिरची खाल्ल्यास संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता अतिशय कमी होते.

२) रक्ताभिसरणास गती – हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे घटक असते. यामुळे दररोज हिरवी मिरची खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. याशिवाय नसांमध्ये रक्तप्रवाह जलद होतो. परिणामी चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.

३) मूड बुस्टर – हिरवी मिरची ‘मूड बूस्टर’ म्हणून काम करते. कारण हिरवी मिरची आपल्या मेंदूमध्ये एंडोर्फिन प्रसारित करते. याचा परिणाम असा कि, आपला मूड बर्‍याच अंशी आनंददायी राहतो. याशिवाय कोणताही ताण आणि तणाव असल्यास आराम मिळतो.

४) सायनस आणि दम्यावर गुणकारी – ताज्या हिरव्या मिरचीच्या रसात १ चमचा मध मिसळून ते रिकाम्या पोटी खाल्ल्यास सायनस वा दम्याच्या रुग्णांना आराम मिळतो. कारण हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन मोठ्या प्रमाणात असते. जे आपल्या नाकात रक्तप्रवाह सुलभ करते. यामुळे सर्दी आणि सायनसच्या समस्यांमध्ये आराम मिळतो. म्हणून, थंडीच्या काळात मिरचीचे सेवन करणे फायदेशीर आहे.

५) डोळ्यांसाठी फायदेशीर – डोळ्यांची दृष्टी कमी वयात कमजोर झाली असल्यास ती वाढवण्यासाठी हिरव्या मिरचीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. कारण हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए आढळून येते. ज्यामुळे दृष्टी वाढण्यास आणि सुधारण्यास मदत होते.

६) वजनावर नियंत्रण – हिरवी मिरची वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असण्याव्यतिरिक्त, त्यात कॅलरीज नसतात. यामुळे हिरवी मिरची खाणे वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते.

७) चेहऱ्यावर तेजस्वी चमक – हिरव्या मिरच्या चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत करतात. कारण हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *