| | |

हिरवा लसूण देतो आरोग्य संबंधित आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन आहारात आपण अनेक भाज्या, मसाले आणि विविध प्रकारचे मिष्टान्न खाणे पसंत करतो. यामध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांबरोबर कंदमुळं, कांदा, लसूण यांच्या पातीदेखील आपण भाजी म्हणून खातो. कारण या पाती चवीला अतिशय स्वादिष्ट आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतात. कारण त्यातून आपल्या शरीराला आवश्यक असणारी शक्ती मिळते. यापैकी लसणाची पाती हिवाळ्याच्या दिवसात अत्यंत लाभदायी आहे. हिरव्या लसणाचा वापर विविध अन्नपदार्थांमध्ये केला जातो. या पातीला स्प्रिंग गार्लिक असेही म्हणतात. हा लसूण काही फारसा तिखट नसतो.

लसणाची कळी जमिनीत तयार होण्याआधी त्याची पात जमिनीतून बाहेर येते आणि तीच काढली जाते. हिरवा लसूण अनेक ठिकाणी बेबी गार्लिक म्हणून प्रसिद्ध आहे. या लसणामुळे अनेक पदार्थांच्या चवीत भर पडते. याचा वापर विविध सुप, चीजी डिप्स, गार्लिक ब्रेड, स्टर-फ्राय किंवा अगदी कोशिंबिर, मीट रोस्ट या पदार्थांसाठी होतो. चला तर जाणून घेऊयात हिरव्या लसणाचे आरोग्यवर्धक फायदे खालीलप्रमाणे:-

  • हिरव्या लसणात एलिसिन नावाचा अँटिऑक्सिडंट घटक भरपूर प्रमाणात असतो. हा घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप मदत करतो.
  • शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली सूज, सर्दी, खोकला वा फ्लूसारखे आजार दूर करण्यासाठी हिरवा लसूण फायद्याचा ठरतो. हिरव्या लसणाची भाजी किंवा सूप प्यायल्याने शरीरावरची सूज कमी होते आणि सर्दी खोकल्यावर आराम मिळतो.
  • हिरव्या लसणामध्ये एलिसिन हा अँटि ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • हिरव्या लसणातील एलिसिन आणि इतर काही घटक कॅन्सरच्या पेशींच्या वाढीस रोख लावतात. परिणामी कॅन्सरपासून बचाव होतो.
  • लहान मुले आवडीने लसणाची पात खात नसतील तर भारतीय मसाल्यांचा वापर करून घरच्या घरी बनवलेल्या गव्हाच्या वा मैद्याच्या नूडल्स तयार करा. यामध्ये लसणाच्या पातीचा मोठ्या प्रमाणावर वापर करा. यामुळे लहान मुलांच्या पोटाला फायदा होतो.

० महत्वाचे – आयुर्वेदानुसार, कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन हे नुकसान करणारेच असते. त्यामुळे हिरव्या लसणीचा देखील अति वापर अर्थात अति सेवन करू नये अन्यथा दुष्परिणाम होतात. मात्र मर्यादित प्रमाणात हिरव्या लसणाचा वा लसणाच्या हिरव्या पातीचा वापर जेवणात करालं तर १००% फायदा होईल.