| | |

हिरवा मटार प्रोटीनचे भांडार; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. हिवाळ्याच्या दिवसात कितीतरी भाज्या बाजारात उपलब्ध होत असतात. यांपैकी एक सगळ्यात आवडती भाजी म्हणजे मटार. मटार बाकीच्या दिवसांपेक्षा थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात आणि स्वस्तही मिळतात. यामुळे हिवाळ्यात मटार जास्त खाल्ले जातात. मटारमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्व समाविष्ट असतात. हि पोषक तत्त्वे शरीराला मजबूत बनवतात आणि ऊर्जाही देतात. यामुळे रोग प्रतिकार शक्तीत वाढ होते आणि आरोग्याला फायदा होतो. तसेच जुने आजार दूर करण्यासाठी हिरवा मटार उपयोगी आहे. हिरव्या मॅटरमध्ये प्रोटीनची मात्रा इतर कोणत्याही भाज्यांपेक्षा अधिक असते. यामुळे हिरवा मटार प्रोटीनचे भांडार म्हणून ओळखला जातो. चला तर जाणून घेऊया हिरवा मटार खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) प्रोटीनचे भांडार – हिरवा मटार प्रोटीनने परिपूर्ण असते. साधारण अर्धा कप हिरव्या मटारमध्ये ४ ग्रॅम प्रोटीन समाविष्ट असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी सहाय्य होते. शिवाय यातील प्रोटीन शरीरातील मांसपेशी मजबूत करतात. याशिवाय सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मटार खाल्ल्यामुळे इम्यूनिटी वाढते.

२) हृदयासाठी आरोग्यदायी – मटारमध्ये आढळणारे मॅग्नेशियम आणि पोटेशियमसारखे मिनरल्स हे आपल्या हृदयासाठी अत्यंत लाभदायक असतात. आपण सारेच जाणतो कि, हृदयाचे बहुतांश आजार ब्लड प्रेशरमुळे होतात. पण अशा स्थितीत हिरवा मटार खाल्ला तर हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करता येते. मॅटरमधील फायबर बॅड कोलेस्ट्रोल कमी करते. शिवाय मॅटरमध्ये असणारे अँटीऑक्सीडेंट हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात.

३) मधुमेहात फायदेशीर – हिरवा मटार ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो. परिणामी रक्तातील साखरदेखील आपोआपच नियंत्रित केली जाते. याचा फायदा मधुमेहाने ग्रासलेल्या व्यक्तींना होत असतो. शिवाय मटार खाल्ल्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.

४) पचनासाठी सहाय्यक – हिरव्या मटारमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे फायबर पोटाशी संबंधित कोणत्याही समस्येवर परिणामकारक आहे. यातील फायबर आपण खाल्लेले अन्न पचण्यासाठी सहाय्यक आहे. तसेच हिरवा मटार खाल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते आणि बाऊल मूव्हमेंट सुधारते.

५) वजनावर नियंत्रण – हिरव्या मटारमध्ये प्रोटीन आणि फायबर हे दोन्ही घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे मटार खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. परिणामी लवकर भूक लागत नाही आणि कोणतेही अतिरिक्त पदार्थ खाणे टाळले जाते. शिवाय मॅटरमध्ये कॅलरी खुप कमी असते. परिणामी वजन कमी करणे सोपे होते.