| |

हिरवागार पालक म्हणजे आरोग्यदाता; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले आरोग्य उत्तम, निरोगी आणि सुदृढ राहावे म्हणून अनेकदा डॉक्टर्स हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये सर्व प्रकारचे पोषक तत्व आढळतात. जे शरीरास लाभदायक असतात. हिरव्या भाज्या म्हटलं कि, सर्वात आधी पालकचेच नाव तोंडी येते. पालक चवीला थोडा तुरट असला तरी अत्यंत स्वादिष्ट असतो. शिवाय आरोग्यासाठीही उपयुक्त असतो.
जास्त करून थंडीच्या दिवसात पालक उपलब्ध होतो. तसे, थंडीत पालक खाण्याचे फायदे जास्त आहेत. पण आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात पालक खाणे थोडे हानिकारक ठरू शकते. कारण पावसात येणाऱ्या पालकमध्ये माती आणि विषाणू जास्त असतात. म्हणून या वेळी पालक खाणे शक्यतो टाळावेच. मात्र अन्य ऋतूत पालक खाणे आरोग्यास अतिशय लाभ देणारे आहे. चला तर जाणून घेऊयात पालक खाण्याचे फायदे.

० पालक खाण्याचे फायदे

१) मेंदूच्या कार्यात सुधार – पालकमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते आणि कॅल्शिअममुळे मेंदूला चालना मिळते. त्यामुळे पालक खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहते शिवाय स्मरण शक्तीतही वाढ होते.

२) कॅन्सरचा धोका कमी – पालकचे सेवन कॅन्सरसारख्या गंभीर रोगालाही दूर करते. पालकमध्ये बीटा कॅरोटीन आणि विटामिन सी असते. ही दोन्ही पोषकतत्व शरीरात विकसित होत असलेल्या कॅन्सरच्या पेशींना नष्ट करतात आणि प्रतिबंध घालतात. परिणामी कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

३) हृदय विकाराचा धोका कमी – हार्टअटॅकचा धोका दूर करण्यासाठी पालकचे सेवन अतिशय लाभदायक आहे. पालक स्ट्रोक आणि हार्टअटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूची जोखीम कमी करतो. शिवाय पालकांमध्ये पोषक तत्व हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम असतात.

४) ब्लड प्रेशरवर नियंत्रण – पालकमध्ये नायट्रेटचे मुबलक प्रमाण असते. हे नायट्रेट ब्लडप्रेशर कमी करण्यात लाभदायक ठरते. त्यामुळे पालकांचे सेवन केल्यामुळे ब्लड प्रेशरवर नियंत्रण मिळविता येते. शिवाय हृदयाला रक्तपुरवठा करण्यातहि पालक फायदेशीर ठरते.

५) ॲनिमियाचा धोका कमी – शरीरातील लाल रक्तपेशींची कमतरता म्हणजेच ॲनिमिया. या रोगाचा सर्वात जास्त धोका गर्भावस्थेत असतो. आयर्न आणि लोहाच्या कमतरतेमुळे ही स्थिती उत्पन्न होत असते. पालकमध्ये आयर्नची मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पालक खाल्ल्याने ॲनिमियाचा धोका टाळता येतो.

६) डोळ्यांच्या समस्येत प्रभावी – डोळ्यांच्या विविध विकार आणि समस्यांपासून दूर राहण्यासाठी पालकचे सेवन अत्यंत प्रभावशाली ठरते. त्यामुळे डॉक्टरदेखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. पालक डोळ्यांमध्ये होणारे मॅक्युलार डीजनरेशन या नेत्र रोगाला नियंत्रित करण्याची क्षमता ठेवतो.

७) हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त – हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी पालक खाणे अत्यंत उपयुक्त आहे. कारण पालक हाडकांच्या निर्माणा पासून ते त्यांच्या विकासापर्यंत मदतयुक्त असते. शिवाय पालक हाडांना मजबुती प्रदान करते. कारण मुळातच पालकमध्ये कॅल्शिअम असते जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते.

८) पचनप्रणालीत सुधार – पालकमध्ये फायबर आणि पाण्याची मात्र भरपूर असते. शिवाय फायबर पचनतंत्र व्यवस्थित कार्यरत ठेवते. त्यामुळे पालक खाल्ल्याने अपचन, गॅसेस यासारख्या समस्या दूर होतात. पालक पोटाच्या कॅन्सरपासूनही बचहव करण्यात सक्षम असतो.

९) वजन कमी करण्यास उपयुक्त – वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी पालकांचे सेवन अत्यंत उपयुक्त ठरते. कारण, पालकमध्ये वजन कमी करणारे गुण असतात. शिवाय पालकमध्ये कॅलरीज अत्यंत कमी असतात. त्यामुळे पालकाचा आहारात समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहते.