Is gym exercise good for body or yoga?
| |

मी फिट राहण्यासाठी जिम करू कि योगा? काय आहे सर्वोत्तम जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीराला काही वेळ तरी व्यायाम करणे आवश्यक आहे . पण आजकाल सगळ्या ठिकाणी व्यायामासाठी जिम चा वापर हा केला जातो. जिम हि आजच्या नवीन पिढीची एक प्रकारची फॅशन झाली आहे. जिम मध्ये गेल्यानंतरच आपला व्यायाम योग्य रित्या होऊ शकतो. त्यामुळे आपली फिटनेस योग्य राहण्यास सुद्धा मदत होऊ शकते. हा जो प्रकार आहे ते अजिबात तथ्य नाही. त्यामुळे फक्त जिम केल्याने आपण निरोगी राहू शकतो का ? हा पण जिम करणे पण शरीराच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

योगा हा प्रकार पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. योगामुळे आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होतो. आपल्या राहणीमानावर ,आपल्या चालण्याबोलण्यावर त्याचा अत्यंत चांगला प्रभाव हा पडला जातो. योगामुळे बुद्धी तल्लख होते. योगा हा साधारण सर्व वयातही व्यक्तींसाठी जास्त लाभकारक आहे. आयुर्वेदामध्ये तुमच्या संपूर्ण शरीराचा विचार करून तुम्ही योगा हा करू शकता. योगाचे अंगीकारणे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दृष्टिकोन बदलण्यासाठी काही प्रमाणात तरी योगा हा केला गेला पाहिजे.

आजकाल सगळे लोक जिम ला जास्त महत्व देतात. जिम आणि ऍलोपॅथी यांची सांगड घालून काही प्रमाणात आपला व्यायाम हा केला गेला पाहिजे. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम हे अनुसरले जातात. आपले स्नायू बळकट करण्यासाठी काही प्रमाणात जिमचा पण वापर हा केला गेला पाहिजे. पायांची हालचाल योग्य पद्धतीने राहण्यासाठी जिमचा वापर पण केला जावा. त्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात ताण हा आपल्या शरीरावर घेऊ नये. त्यामुळे कदाचित इतर अवयवांना सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जिम करताना प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात केला जाऊ नये. आपली ताकद हि ज्या प्रकारे वाढेल तसा व्यायाम हा निवडला जावा.