Hair Fall Reasons in Marathi
|

जर तुमचे केस पातळ होत असतील तर, त्याच्यापाठीमागे असेल ‘हे’ कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या घरातील अनेक पुरुषांना हा केस गळतीचा हा जास्त त्रास होतो. त्यामुळे पुरुषांना जर या समस्यांना सामोरे जावे लागते. केस म्हंटले कि, अनेक लोकांना त्याच्या जीवनातला महत्वाचा भाग वाटतो. केसांवर आपले सौदर्य हे जास्त अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक जण आपली केसांची काळजी हे करतातच. केस जर सुंदर आणि नितळ असतील तर त्याने तुमचे सौदर्य हे वाढते. Hair Fall Reasons in Marathi

एखाद्यावेळी गळ्यात दागिने नसले तरी चालतील पण डोक्यावर घनदाट केस असावे असे प्रत्येक महिलेला वाटते . पण केसांची वाढ ही सर्वस्वी अनुवंशिकता, केसांची निगा, वय या अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. पण कधीकधी काहीजणांचे चांगले जाडजूड असलेले केस पातळ कधी होतात ते कळत नाही. अचानक केसांचा झुपका केसांच्या शेपटीमध्ये कधी बदलतो हे देखील अनेकांना कळत नाही. पण केस पातळ होण्यामागेही काही कारणं आहेत त्यापैकी तुमचे केस या कारणांमुळे तर पातळ झाले नाहीत ना हे तपासून तुम्ही योग्य तो इलाज करु शकता.

कारणे —-

— केस बांधण्याची पद्धत केसांसाठी फारच हानीकारक ठरु शकते. काही जणांना केस ओढून किंवा ताण देऊन किंवा घट्ट बांधतात . त्यामुळे केस हे तुटले जातात आणि केस पातळ होतात.

— जर अनेकांना सारखे केस विंचरायची सवय हि जास्त असते. सतत केस विचारल्याने अनेक वेळा आपले केस हे पातळ होतात हे लक्षात येते. जर केसांना ओढून ताण देऊन विंचरत असाल तर केस मुळापासून दुखावले जातात. केसांची मुळ दुखावली गेली की , टक्कल पडतो. Hair Fall Reasons in Marathi

— आपण आपल्या केसांची निगा हि व्यवस्थित राखली नाही तर मात्र आपल्या डोक्यावर टक्कल पडला जातो. केसांमध्ये झालेला कोंडा हा केस पातळ होण्यासाठी कारणीभूत असतो. त्यामुळे डोक्यांना टक्कल पडला जातो.

— अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी केसांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे ट्रीटमेंट करतात अश्या वेळी केसांच्या सतत ट्रिटमेंट्सही तुमच केस पातळ करु शकतात. केसांवर जर सतत चुकीच्या केमिकल्सचा प्रयोग होत असेल तरीदेखील तुमचे केस गळू शकतात.

— अनेक मुली या केस सतत धुतात आणि वेगवेगळ्या केमिकल्स चा वापर हा आपल्या केसांसाठी करतात. त्यामुळे आपले केस गळतीचे प्रमाण हे जास्त असते. आपल्या केसांना तेल लावण्याची सवय चांगली असली तरी देखील केसांना सतत तेल लावल्यामुळे केसांच्या स्काल्पवर तेलाचा थर राहिला तर केस वाढण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळेच केस पातळ होऊ लागतात. Hair Fall Reasons in Marathi

— केस धुताना कमीत कमी आठवड्यातून एकदा धुवा कारण केसांमध्ये असलेली घाण बाहेर काढणे गरजेचे असते. केस धुण्याची सवय ही चांगली आहे. पण केस धुण्याची तुमची रोजची सवयही तुमच्या केसांना कमजोर करु शकते.