पावसाळ्यात वाढल्या केसांच्या समस्या? मग अशी घ्या काळजी; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। रेशमी, मुलायम, चमकदार आणि दाट केस असावे असे प्रत्येक मुलीला मनोमन वाटते. पण अशी अनेक करणे आहेत ज्यामुळे केसांचे निरोगी आरोग्य दीर्घ काळ टिकवणे अशक्य होऊ लागते. त्यात पावसाळा सुरु झाला कि या समस्यांना आणखीच उधाण येते. पावसात भिजल्यावर सिनेमातील अभिनेत्रींचे केस अगदी सुंदर दिसतात पण सत्य परिस्थिती थोडी वेगळीच आहे. पावसात एकदा का केस भिजले कि, केसांचे सौंदर्य काहीसे लपूनच जाते. अशा वेळी काही साध्यासुध्या टिप्स खूप कमी येतात. याच टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने तुम्ही पसंत भिजल्यानंतरही केसांची योग्य काळजी घेऊ शकाल.
- पावसात भिजल्यानंतर घरी गेल्यावर केसांवरून आंघोळ करून केस व्यवस्थित टॉवेलने कोरडे करून घ्या. यानंतर केसांवर स्काल्प स्केलर (शॅम्पूचा प्रकार) लावा. यानंतर पुढील १० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.
- केसांना शॅम्पू लावल्यानंतर केसांचा स्काल्प सोडून फक्त केसांवरच कंडिशनर वापरा. यानंतर पुढील २ मिनिटांनी केस स्वच्छ धुवा.
- अँपल साईडर व्हिनेगर केसांसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे भिजल्यानंतर केस धुण्याआधी ५ मिनिटांपूर्वी केसांना हे व्हिनेगर लावा आणि सौम्य शॅम्पूने केस धुवा.
- डोक्यावर तेल लावून आपल्या बोटांनी हळुवार मालिश करा. केसांना मसाज केल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेला वाफाळता टॉवेल साधारण ५ ते ७ मिनिटांसाठी डोक्याभोवती गुंडाळून ठेवा.
- केस मऊ आणि चमकदार होण्यासाठी आठवड्यातून किमान एकवेळ तरी हेअर मास्कचा वापर करावा. यामुळे पावसात भिजला तरीही केस तितकेच सुंदर दिसतील.