| |

कमी वयात केस पांढरे झाले?; मग या घरगुती टिप्स नक्की वापरा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या अनेको लोक केस गळती, केस पांढरे होणे यासारख्या केसांच्या समस्यांनी हैराण झाले आहेत. मुळात या सगळ्याला बदलती जीवनशैली, चुकीचे खाणे-पिणे आणि रासायनिक सौंदर्य उत्पादनांचा वापर हे सर्व काही कारणीभूत आहे. कधी कधी एखाद्या कार्यक्रमात जायचे म्हटले कि, पांढरे केस असणाऱ्यांची गोची होते. मग हे लोक केस काळे करण्यासाठी डाय किंवा मेंदी अशा पर्यायांचा अवलंब करतात. पण केसांना काळे करण्यासाठीची हि पद्धतच मुळी चुकीची आणि. कारण हे पर्याय अगदीच तात्पुरते उपाय आहेत. एकदा का डाय आणि मेंदीचा प्रभाव गेला कि झालं पुन्हा केस जैसे थे. म्हणूनच आज आपण काही अश्या घरगुती टिप्स जाणून घेणार आहोत ज्यांचा वापर केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी अगदी सहज करता येतो.

१) नारळाचे तेल
– एका लहान लिंबाचा रस नारळ अर्थात खोबरेल तेलात मिसळून केसांना लावल्याने पांढरे केस काळे होतात. यासाठी हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून स्कॅल्पला लावून हलक्या हाताने मॉलिश करा. यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होतील. या उपायासाठी नारळ तेलाऐवजी बदाम तेल वापरले तरीही उत्तम.

२) कांद्याचा रस
– एका लाल कांद्याचा २ ते ३ चमचे रस, त्यात १ चमचा लिंबाचा रस आणि गरजेइतके ऑलिव्ह तेल मिसळून केसांची चांगली मॉलिश करा. यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घ्या. यातील कांद्याचा रस केसांना काळे करतो आणि केसांची वाढ वेगाने करतो. तर लिंबाचा रस केसांना नैसर्गिक चमक देण्यास सक्षम असतो.

३) कडीपत्ता
– कडीपत्ता केसांना काळे करून केसांची वाढ करण्यास सक्षम असतो. यासाठी कडीपत्त्याच्या पानांची पुढं करून त्यात २ चमचे आवळा पूड आणि २ चमचे ब्राह्मी घालून व्यवस्थित मिसळा. या मिश्रणाचा वापर एखाद्या हेअर मास्कप्रमाणे करा. जवळजवळ १ तास हा मास्क केसांना लावून ठेवा. यानंतर सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवून घ्या.

४) ब्लॅक टी
– या उपायासाठी १ कप पाण्यात २ चमचे ब्लॅक टी आणि १ चमचा मीठ मिसळून ते चांगले उकळवून घ्या. यानंतर हे पाणी असेच थंड होऊ द्या आणि हे थंड झाल्यावर गाळून केसांवर लावून ठेवा. केस असेच वाळू द्या. याचा नियमितपणे वापर केल्याने केस लवकर काळे होतात.

५) कोरफड
– या उपायात एका कोवळ्या कोरफडीच्या गरात खोबरेल तेल मिसळून केसांना एखाद्या हेअर मास्कप्रमाणे लावून ठेवावा. यानानंतर एका तासाने केस स्वच्छ आणि कोमट पाण्याने धुवून घ्यावे. यामुळे केसांना नैसर्गिक चमक, रंग आणि कोमलता मिळते.