गुणकारी गवती चहा आणि त्याचे आश्चर्यचकित करणारे ‘हे’ फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन : उन्हाळा चालू आहे पण गेले काही दिवस वातावरण मात्र पावसाळी झालं आहे. दुपारनंतर वेध लागतात ते गरमागरम चहा चे. त्या चहामध्ये जर गवती चहा(Lemon Grass) आणि आले असेल तर मग ‘क्या बात है’.  आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे. सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल. गवती चहाला पातीचा चहा असे देखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात. तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते.

गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणाऱ्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते. गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो. बऱ्याच जणांच्या घरातील कुंडीत गवती चहा लावला जातो. गवती चहाला एक प्रकारचा सुंगध असतो. गवती चहा प्यायल्याने फ्रेश वाटतं किंवा दिवसभरात कामाचा कंटाळा आला असल्यास गवती चहा रिफ्रेश करतो.

गवती चहाला सुगंध भूतृण (संस्कृत), अग्याघास, गंधबेना (हिंदी), हरिचांय (सिंधी), गंधतृण (बंगाली), अशा विविध नावाने संबोधलं जातं. तर त्याच्या अर्कास‘ऑइल ऑफ व्हर्बेना’ किंवा ‘इंडियन मेलिसा ऑइल असेही म्हणतात. गवती चहाचे शास्त्रीय नाव  Cymbopogon citratus; इंग्लिश: lemon grass आहे. चहाची चव वाढविणाऱ्या या गवती चहाचे अनेक विविध फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात गवती चहाचे काही फायदे. –

गवती चहा पिण्याचे फायदे-

गवती चहा, पुदिना, दालचिनी, आलं समप्रमाणात घेऊन त्यात पाणी आणि गूळ मिसळून काढा करावा. हा काढा अर्धा कप प्रमाणात रोज रात्री प्यावा आणि ऊबदार कपडे, पांघरुण घेऊन झोपावे. यामुळे जुनाट सर्दी पडसे कमी होते.

  • गवती चहा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. फंगल इनफेक्शन टाळण्यासाठी गवती चहा प्यावा.
  • मासिक पाळीत येणाऱ्या कॅम्प पासून आराम मिळवण्यासाठी गवती चहा घेऊ शकता.
  • कामाची दगदग धावपळ. डोकेदुखी, अंगदुखी जाणवत असल्यास गवती चहा प्यावा.
  • ताप येत असल्यास गवती चहा, दालचिनीचा काढा घ्यावा, ताप झटक्यात कमी होतो.
  • सांधे दुखी, गुडघेदुखीचा त्रास होत असल्यास गवती चहाचे तेल लावल्याने आराम मिळतो.
  • गवती चहा “डिटॉक्स टी” म्हणून वापरला जातो. गवती चहा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते.
  • गवती चहामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे बल्ड पेशर कमी करण्यास मदत करते.
  • गवती चहा प्यायल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत करते.
  • गवती चहा व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन “सी चा चांगला स्त्रोत आहे. ज्याने जी त्वचेला तेलकटपणा पासून दूर करते.
  • गवती चहाचा डाययुरेटिक (लघवीचा प्रमाण वाढवणारा पदार्थ) म्हणून वापर केला जातो.
  • गवती चहामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, फॉलेट, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
  • थंडी-ताप किंवा आकडी येत असल्यासही गवती चहा उकळून प्यायल्यास आराम मिळतो.
  • जर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा.
  • डोकं दुखत असल्यास साध्या चहाच्या पाण्यात चार पानं गवती चहाची घालावीत.
  • गवती चहा उष्ण, स्वेदजनन, मूत्रजनन, ज्वरघ्न, वायुनाशी, उत्तेजक, चेतनाकारक, संकोचविकास प्रतिबंधक आहे.
  • शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने त्या भागावर मालिश करावी.

आता आपल्या लक्षात आलेच असेल कि गवती चहा आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे.  मग विचार कसला करताय कामातून सवड काढून मस्तपैकी चहा चा एक कप घ्या म्हणजे एकदम प्रफुल्लित, ताजेतवाने व्हाल.