| |

करवंदांची मज्जा न्यारी!!! जाणून घ्या करवंदाचे ‘हे’ आरोगयवर्धक फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन : उन्हाळा सुरू झाला की सर्वांना प्रतिक्षा असते ती फळांचा राजा आंबा कधी एकदा पिकतो आणि ते खाण्याची. यासोबतच माळरानावर किंवा डोंगरावरील रामनेवासुद्धा येतो. रानमेवा म्हणजे डोंगरची मैना म्हणून प्रसिद्ध असणारी करवंदं, रसदार जांभळं, मलबेरी किंवा तुती, आंबट- गोड चिंचा आणि कैऱ्या, ताडगोळे, बेलफळं, जाम असा विविध प्रकारचा रानमेवा या काळात मिळतो. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी जवळ असलेल्या जंगलामुळे काही वेगळी फळंही दिसतात. उदा. आंबोशी आणि चिकूसारखे दिसणारे अळू वगैरे. या प्रत्येक फळाची चव वेगवेगळी असून त्यात ठासून पोषक तत्त्वं भरलेली आहेत. बऱ्याचशा रानमेव्याची सगळी माहिती अजूनही आहारशास्त्राला मिळालेली नाही. याला कारण हा रानमेवा ठराविक काळासाठी उपलब्ध असतो आणि त्याचा पुरवठाही नियमित नसतो. यापैकी  करवंद खाण्यात एक वेगळाच आनंद असतो. कारण प्रत्येक सिझनमध्ये वेगवेगळी फळे येतात. आपण त्याचा आस्वाद फक्त ते फळ आवडत असेल तरच घेतो. त्यामुळे आज आपण रानमेव्याचे आरोग्यादायी फायदे पाहणार आहोत.

करवंद एक औषधीफळ शहरामध्ये सहसा मिळत नाही पण ग्रामीण भागात यांची डोंगरावर, कुंपणाला जंगलात मोठी मोठी झुडपे असतात यांना भरपूर काटे असतात. खरी मज्जा हि करवंदे डोंगरात करवंदाच्या जाळ्यात स्वतः करवंदे काढून खाण्यात जो गोडवा मिळतो. तो त्यालाच विचारा कि ज्याने अश्या प्रकारे करवंदे खाल्ली आहेत.  हिरवी करवंदे आंबट तुरट असतात त्यांची चटणी एकदम झकास लागते. याशिवाय त्याचे लोणचे आणि मिठाच्या पाण्यात ही करवंदे ठेवतात. करवंदाचे सरबत ही केले जाते. त्यानंतर पिकलेली करवंदे वरून काळया किंवा लाल रंगाची असतात आणि आतून लाल किंवा पांढऱ्या रंगाची असतात. काही आंबट लागतात तर जास्त करून गोड असतात. ही करवंदे शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात त्यांच्यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. करवंदाच्या जाळ्या असतात. करवंद हे खुप लहान असतं म्हणजे त्याचा आकार लहान काचेच्या गोटीप्रमाणे असतो. जाळीला करवंद आलीत की ती हिरव्या रंगाची असतात  पिकल्या नंतर ती जांभळ्या रंगाची होतात.

करवंदाचे आरोग्यवर्धक फायदे : 

  • कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरातील हाडांच्या ठिसूळ होण्यावर दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. शरीरात रक्ताची कमतरता बहुतेक जणांना जाणवत असते उन्हाळ्यात हि जास्त करून थकवा जाणवतो त्यासाठी वाटी भरून करवंदे खावीत. त्यामुळे नक्कीच रक्ताची कमतरता दूर होईल. याशिवाय उन्हाळ्यात शरीराची उन्हात फिरल्या मुळे आग होत असते यावेळी करवंद खावीत.
  • या करवंद मध्ये तंतू भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे मलावरोधचा त्रास कमी होतो पोट साफ राहते. करवंद या फळात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तुमच्या त्वचेचा कोणताही विकार असो त्यावर गुणकारी आहे. मळमळ उलटी यावर ही करवंदे खाणे अत्यंत फायदेशीर आहे. याशिवाय ज्यांना ह्रदयाच्या आजार आहे त्यांनी ही करवंदे खाणे गुणकारी आहे.
  • करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. त्यासोबतच करवंदामध्ये कॅल्शिअमसुद्धा आढळते. त्यामुळे हाडांसाठी करवंद अगदी महत्वाची आहेत.
  • करवंदाची पानेही औषधी आहेत. कारण करवंदाची पाने तोडून ती बारिक करून खाल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.
  • गर्भवती असलेल्या महिलांना मळमळ उलटीचा त्रास होत असेल तर त्यांनी या सिझनमध्ये जरूर करवंद खावीत.
  • करवंद वातशामक असल्याने पोटाचे विकार,आतड्याचे रोग हे बरे होतात.पोटात वायूचे मलावाटे निस्सरण होते. त्यामुळे पोटाच्या आजारांवर करवंद फायद्याची आहेत.
  • अमेरिकेतील संशोधकांनी प्रयोग केलेल्या गटाचे करवंदाच्या सेवनाने स्मरणशक्तीत वाढ आणि दृष्टी चांगली झाली हे स्पष्ट झालं आहे.
  • करवंदामध्ये सायट्रिक ऍसिड आढळते. त्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर करवंद खाणं फायद्याची आहेत.
  • करवंदामध्ये मोठया प्रमाणात फायबर आढळते याचा फायदा आपलं पोट साफ होण्यासाठी होतो.

शहरी भागातील लोकांना करवंद विकत घ्यावी लागतात मात्र काहींना ती विकतही मिळत नाहीत. कारण इतर फळ बाजारात असतात मात्र करवंदे  सिझनमध्येच येत असल्याने ती क्वचितच बाजारात मिळतात.