| | |

गुळाचा रोजच्या आहारात समावेश केला तर होतील ‘हे’ जबरदस्त फायदे; जाणुन घ्या आरोग्याला लाभदायक गुणधर्म

गुळाचा रोजच्या आहारात समावेश केला तर होतील हेजबरदस्त फायदे; जाणुन घ्या आरोग्याला लाभदायक गुणधर्म

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आज गुडीपाडवा, आपल्या भारतीय संस्कृती सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. आणि सण गोड पदार्थाशिवाय पूर्ण होत नाहीत. त्यात आपणांकडे गोड पदार्थ म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पानी सुटते. दिवाळी, गणपती, दसरा गुढीपाडवा यांसारख्या सणांना गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पुरणपोळी, चिक्की, मोदक यांसारखे पदार्थ गुळापासून तयार केले जातात. आधीच्या काळी म्हणजेच 15 ते 20 वर्षापूर्वी जर कोणाकडे पाहुणे आले तर घरातील मंडळी पाणी आणि गूळचा खडा अवश्य देत असे. कारण गूळ हा उष्णता वर्धक पदार्थ आहे. म्हणून गुळाचे रोजच्या आहारात समावेश केल्याने अनेक फायदे होतात. डॉक्टर सुद्धा गुळाचा रोजच्या आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. तर काय आहेत गूळ खाल्याचे फायदे…

 

  1. फुफ्फुसातील संसर्ग रोखतो – गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा (Metabolism) वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या (Lungs) संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो.

 

  1. पोटाच्या तक्रारींवर गुणकारी – पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॅसिडीटीची (Acidity) तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो.

 

  1. आंबट ढेकरींपासून सुटका – गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते.

 

  1. सांधेदुखीतून सुटका – सांधे दुखत असतील (Joint Pains) तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो.

 

  1. भूक लागणं – जेवणानंतर गूळ खाल्ल्यानं पचन चांगलं होतं. गूळ खाण्यानं भूकही वाढते.

 

  1. थकवा दूर होतो – गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा.

 

  1. रक्ताची कमतरता भरून निघते – गूळ हा लोहाचा (Iron) मोठा स्रोत आहे. तुमचं हिमोग्लोबिन (Hemoglobin) कमी झाले असेल तर रोज गूळ खाण्यानं तात्काळ फायदा होतो. गूळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात.

 

  1. रक्तदाब नियंत्रणात राहतो – गुळामुळे रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

  1. हाडं मजबूत होतात – गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं. हाडांना (Bones) बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे गूळ खाण्यानं हाडांसाठीही लाभदायी ठरते.

 

  1. शरीर कार्यक्षम राहतं – गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणे उपयुक्त ठरते. दुध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्रॅम गूळ, थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होईल.

 

  1. सर्दीवरही गुणकारी – सर्दी-पडसं दूर करण्यासाठीही गूळ लाभदायी ठरतो. काळीमिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसं कमी होतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभकारक ठरतं. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते.

 

  1. डोळ्यांसाठीही लाभदायी – गूळ खाल्ल्यानं डोळ्यांची क्षीणता कमी होते. दृष्टी सुधारण्यासही मदत होते.

 

  1. बुद्धीही वाढते – तुमचा मूड सुधारण्यासाठीही गुळाची मदत होते. मायग्रेनचा त्रास असेल तर रोज गूळ खाण्यानं फायदा होतो. नियमितपणे गुळाचे सेवन केल्यास तुमचा मेंदूही तरतरीत राहतो, स्मरणशक्तीही चांगली राहते.

 

  1. त्वचेसाठीही उपयुक्त – त्वचा (Skin) तुकतुकीत राहण्यासाठी गुळ उपयुक्त ठरतो. शरीरातील हानिकारक विषद्रव्ये बाहेर काढून टाकण्यात गूळ मदत करतो त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. मुरमांच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर दररोज गूळ खाणे उपयुक्त ठरते.

 

  1. आवाज चांगला राहतो – गूळ आणि आलं गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते. त्यामुळे आवाज बसत नाही.