Health Tips
| |

Health Tips : आहारामध्ये एक तुकडा मुळ्याचा करा समावेश; हाय BP पासून ते बद्धकोष्ठता झटपट होईल दूर

Health Tips । आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळे पदार्थ सेवन करत असतात, परंतु या सर्व पदार्थांमधून शरीराला पोषक तत्व मिळतात असेच नाही. अनेकदा शरीराच्या वाढीसाठी व संरक्षण कवच निर्माण होण्यासाठी काही पदार्थ अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे नियमितपणे पालेभाज्या खात असतात परंतु चुकीच्या पद्धतीने पालेभाजी सेवन केल्याने आपल्याला फारसा परिणाम दिसून येत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांना बद्धकोष्ठता (Constipation), हाय ब्लड प्रेशर (High BP) , पोटाच्या समस्या, पोट फुगणे, पोटामध्ये गॅस निर्माण होणे असे समस्या सतावत असतात. जर तुम्हाला देखील या समस्यांमुळे औषध उपचार करावे लागत असेल तर चिंता करू नका. आज आपण अशा एका भाजीबद्दल जाणून घेणार आहोत. ही भाजी सर्वसाधारणपणे बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होत असते. या भाजीचे नाव आहे मुळ्याची भाजी. मुळा आपल्या सर्वांना माहितीच आहे. मुळ्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देखील बनवले जातात. मुरंबा, पराठे, चटणी देखील बनवली जाते. आज आपण एक तुकडा मुळा खाल्ल्याने आपल्या शरीराला (Health Tips) नेमकी काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

मुळामध्ये प्रोटीन, विटामिन ए, लोह, आयोडीन कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखे पोषकत्व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात यामुळे तुमच्या शरीराला खनिज तत्व व पोषण मिळतात सोबतच शरीराला संरक्षण कवच देखील प्राप्त होत असते.

फायबर चा स्त्रोत

मुळामध्ये फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते त्यामुळे आपली पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करते. तुम्हाला कोणतेही पदार्थ खाल्ल्याने वारंवार गॅस बद्धकोष्ठता सतावत असेल तर अशावेळी आहारामध्ये एक तुकडा मुळा अवश्य सेवन करा यामुळे तुमच्या शरीरातील लिव्हरचे कार्य सुधारेल. लिव्हर चे कार्य करू लागेल. तुम्ही मुळा सलाड म्हणून देखील सेवन करू शकता.

हृदय राहते निरोगी – Health Tips

जीवनशैली बदलल्यामुळे प्रत्येक जण ताणतणावाचे जीवन जगत आहे, अशावेळी वारंवार टेन्शन घेतल्याने त्याचा विपरीत परिणाम आपल्या हृदयावर दिसून येतो. ज्या व्यक्तीचे हृदय चांगल्या पद्धतीने कार्य करत नाही अशा व्यक्तीला हार्ट अटॅक, हृदयामध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याची शक्यता अधिक दिसून येते. अशावेळी जर आपण नियमितपणे मुळात सेवन केले तर हृदयाची गती चांगले राहते. हृदयापर्यंत रक्ताभिसरण देखील व्यवस्थित रित्या पोहोचते. भविष्यात तुम्हाला हृदयासंबंधित कोणतेही आजार होणार नाही.

जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल तर मुळा हा तुमच्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. यामध्ये पोटॅशियमची मात्रा सर्वात जास्त असते आणि पोटॅशियम मुळे आपल्या ब्लडप्रेशरची मात्रा कमी होते, अशावेळी जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशर वारंवार सतावत असेल तर एक तुकडा मुळाचा अवश्य आहारामध्ये समावेश करा.

रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते

हल्ली प्रत्येकजण नाजूक झालेला आहे. वातावरणामध्ये थोडासा बदल झाला तरी आपल्याला सर्दी, खोकला, ताप यासारखे लक्षणे सतावत असतात यामुळे रोगप्रति कारक शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला वारंवार अशक्तपणा सतावत असेल तर मुळाचा तुकडा व मुळापासून बनवलेले पदार्थ सेवन करा यामुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक निघून तर जातील पण त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहील (Health Tips) अशा प्रकारे नियमितपणे आहारात एक तुकडा मुळाचा सेवन केला तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही. तुमचे शरीर अगदी उत्कृष्ट पद्धतीने कार्य करेल. कोणत्याही महागड्या औषधांची खरेदी देखील तुम्हाला करावी लागणार नाही, म्हणूनच आजपासून मुळा सेवन करा.

टीप : वरील माहिती सर्वसाधारणपणे सांगण्यात आलेली आहे उपाय करताना तज्ञ मंडळींचा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.