Health Tips- Milk Water
| | |

Health Tips: पाणी आणि दुधाचे ‘असे’ सेवन कराल तर 100% आजारी पडालं; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Health Tips बहुतेकदा आपण आजारी पडल्यानंतर आपण आजारी का पडलो..? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मग अशावेळी तर्क वितर्क लावणे कितपत योग्य आहे…? स्पष्ट सांगायचे झाले तर आजारपणामागे एकतर रोग प्रतिकार शक्तीची कमतरता कारणीभूत असते नाहीतर मग चुकीचे आहार संयोजन. होय. अनेकांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. अशावेळी पाणी प्यायल्याने तहान तर भागते पण शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण होत नाही. इतकेच नव्हे तर अशा पद्धतीने कोणताही द्रव पदार्थ प्यायल्यास सांध्यांना त्रास होतो.

आजकाल कमी वयात आरोग्याच्या अनेक समस्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. दरम्यान महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या सामान्य झाली आहे. पण ही समस्या का उदभवते..? यापेक्षा त्यावर उपचार घेण्याचीच घाई आपल्याला जास्त असते. परिणामी आपण विविध उपचारांच्या नादात रोजच्या शैलीतील चुकांकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो. (Health Tips) याशिवाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणालाही कधीही जाणवणारी एक आरोग्यविषयक समस्या म्हणजे अपचन. अपचन झालं कि जाहिरातींमध्ये दाखवली जाणारी औषधे घेण्याचं काही भलतंच खूप आपल्यात आहे. यामुळे होत काय …? कारणाशिवाय उपचार घेतले जातात आणि मूळ कारण बाजूला राहिल्यामुळे आरोग्याचे नुकसान होतेच.

Milk

मित्रांनो, तुम्ही कधीच असा विचार केलेला नाही का..? कि या समस्या उदभवण्याचे मुख्य कारण काय असू शकते..? तर आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या समस्यांमागे आपण सेवन करत असलेले द्रव पदार्थ कारणीभूत असतात. होय. चला तर जाणून घेऊया तज्ञ काय सांगतात आणि यानंतर अन्य आवश्यक माहितीसुद्धा घेऊया.

० काय सांगतात तज्ञ..?
(Health Tips)

आहार तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, सांधेदुखी असो वा गुडघेदुखी याशिवाय अगदी पोटदुखी असो वा अपचन यामागे एकमेव कारण म्हणजे सर्व पदार्थांचे चुकीच्या पद्धतीने केले जाणारे सेवन. (Health Tips) आता द्रव पदार्थ म्हणजे काय..? तर पाणी आणि दूध अशा पदार्थाना द्रव म्हणजेच लिक्विडजन्य पदार्थ म्हणून ओळखले जाते.

water and milk are beneficial for health. However, if consumed without following the rules, it can lead to health problems.

तुम्ही अनेकदा पाहिले असाल कि, जेव्हा जेव्हा पोट खराब होते तेव्हा डॉक्टर सगळ्यांत आधी दूध न पिण्याचा सल्ला देतात. कारण चुकीच्या पद्धतीने दूध आणि पाणी प्यायल्याने अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच तज्ञांनी पाणी आणि दूध कसे प्यावे म्हणजे बाधणार नाही ते सांगितले आहे. चला जाणून घेऊ.

० पाणी कधी आणि कसे प्यावे..?

मित्रांनो जगायचे असेल तर पाणी अत्यंत आवश्यक आहे. कारण सजीव घटकांच्या जीवनात पाणी हेच जीवन समान आहे. घशाला कोरड पडली म्हणून पाणी प्यायले जात नाही तर शरीराला त्याची आवश्यकता आहे म्हणून पाणी प्यायले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण न झाल्यास आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होतात. पण चुकीच्या पद्धतीने पाण्याचे सेवन केल्यासही आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. (Health Tips)

Drinking Water

जसे कि चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने गुडघ्याची समस्या वाढू शकते. तसेच थेट उभे राहून पाणी प्यायल्याने पोटावर दाब निर्माण होतो. शिवाय उभ्याने पाणी प्यायल्यास अन्ननलिकेतून पाणी अतिशय दाबाने पोटात जाते. त्यामुळे पोटाभोवती असलेल्या कार्य पेशी आणि स्नायूंवर त्याचा गंभीर परिणाम होतो. याचा परिणाम शरीराच्या जैविक प्रणालीवर होतो आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे लक्षात ठेवा की,

पाणी पितेवेळी व्यवस्थित बसून प्या. (Health Tips)

दिवसभरात १० ते १२ ग्लास पाणी प्या.

सकाळी उठल्यानंतर १ ग्लास साधे पाणी प्या. यानंतर नाश्ता करण्याआधी चहा कॉफीऐवजी कोमट पाण्याचे सेवन करा.

शिवाय जेवणाआधी १ तास आणि जेवल्यानंतर १ तासाने पाणी प्या. अशा वेळेनुसार पाणी प्यायल्याने त्याचे आरोग्यदायी फायदेच मिळतात.

० दूध कधी आणि कसे प्यावे?

(Health Tips) दुधामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम समाविष्ट असते. त्यामुळे दुधाचे सेवन अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत गरजेचे आहे. शिवाय दूध हाडे मजबूत करते. कॅल्शियमची मात्रा पूर्ण करते. अशाप्रकारे दूध अतिशय लाभदायी भूमिका बजावते. पण जर दूध पिताना काही नियमाचे पालन केले गेले नाही आणि त्याचे सेवन चुकीच्या पद्धतीने झाले तर साहजिकच याचा उलट परिणाम होतो. म्हणून लक्षात ठेवा कि,

दूध नेहमी रात्री पिणे फायदेशीर आहे. पण संध्याकाळी जेवण केल्यानंतर साधारण २ तासांनी कोमट दूध प्या. (Health Tips)

तसेच ज्याप्रमाणे पाणी बसून पिणे बंधनकारक आहे तसेच दूध नेहमी उभे राहून पिण्यावर भर द्या. यामुळे पचनाचा त्रास होत नाही. शिवाय उभे राहून दूध प्यायल्याने गुडघा खराब होण्याची भीती नसते, कॅन्सरचा धोकाही कमी होतो.

दूध पिताना यामध्ये हळद मिसळून प्या. असे केल्यास हे दूध तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवेल. शिवाय त्वचा उजळण्यासदेखील मदत मिळेल.

‘हे’ पण वाचा :-

रात्री झोपेत घश्याला कोरड पडून तहान लागते..?; जाणून घ्या कारणे आणि उपाय

चाळिशीतही मजबूत शरीर हवे असेल तर, ‘हे’ दूध जरूर प्या; जाणून घ्या कृती आणि फायदे