Milk
| | |

चाळिशीतही मजबूत शरीर हवे असेल तर, ‘हे’ दूध जरूर प्या; जाणून घ्या कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजची बदलेली जीवनशैली, दगदग, धावपळ, अपूर्ण झोप, अपूर्ण आहार यामुळे कमी वयातच आपले वय जास्त वाटू लागते. याची सगळ्यात जास्त चिंतन दिसते ती तरुणांच्या चेहऱ्यावर. यात प्रामुख्याने खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तब्येतीविषयीचा निष्काळजीपणा इतर आरोग्यविषयक समस्या वाढवितो. हि बाब कितीही स्पष्ट दिसत असली तरीही लोक आरोग्याबाबत हेळसांड करण्याच्या सवयीमुळे उशीरा औषधे घेतात. तोपर्यंत या समस्या मोठ्या झालेल्या असतात. यामुळे होतं असं कि, उतरत्या वयाच्या वेळी याच समस्या व्याधी होऊन आणखी पीडा देतात. म्हणूनच वेळीच आपण आपल्या आरोग्याबाबत सतर्क असणे गरजेचे आहे. याकरिता आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांविषयी सांगणार आहोत जे तुमच्या दैनंदिन आहारात असतील तर वयाच्या चाळिशीतही तुमचं शरीर अगदी मजबूत राहील. जाणून घ्या खालिलप्रमाणे:-

० खारीक आणि मखाना दूध असे बनवा:-

ही एक घरगुती पाककृती आणि चविष्ट उपाय आहे. दुधासोबत खारीक आणि मखाना यांचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप फायदा होतो. हा पदार्थ बनविण्यासाठी खारीक आणि मखाना पाण्यात वा दुधात २ ते ४ तास भिजत ठेवा.
यानंतर योग्य प्रमाणात दूध घेऊन खारीक आणि मखान्यासोबत ग्राइंडरच्या सहाय्याने बारीक करा. जेणेकरुन हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळतील.
अशा प्रकारे, खारीक-मखानाचे दूध तयार. हे एक उत्तम एनर्जी-ड्रिंक म्हणून ओळखले जाते. याचे सेवन तुम्ही कधीही करू शकता. शिवाय हवं असल्यास या दुधात मध आणि अश्वगंधादेखील घालता येईल.

दूध, खारीक आणि मखान्याचे विशेष गुण जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

खारीक – मखान्याचे दूध पिण्याचे फायदे. लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

  • या घरगुती उपायाच्या वापराने शारीरिक थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.
  • या दुधाचे दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
  • हे दूध रोज पिणाऱ्यांची पचनक्रिया सुरळीत राहते. कारण, यात फायबरचे प्रमाण चांगले असते.
  • हे दूध दररोज रात्री प्यायल्यास झोपही चांगली लागते. कारण, यामुळे शरीरातील स्लीपिंग-हार्मोनचा स्राव वाढतो. परिणामी निद्रानाशाची समस्या उदभवत नाही.