Health Tips
| |

Health Tips : मिठाचं जास्त प्रमाण ठरू शकतं जीवघेणं? ‘या’ 5 घातक आजारांची शक्यता; WHO चा रिपोर्ट काय म्हणतो पहाच

हॅलो आरोग्य ऑनलाईन (Health Tips) । जेवणात किती मीठ असावं याचं प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असत. परंतु जर तुम्ही मिठाचं जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण अति प्रमाणात मीठ घाण्याने घातक आजार होण्याची शक्यता आहे. याबाबत WHO चा एक रिपोर्ट समोर आला असून माणसाने किती प्रमाणात मीठ घायला हवं याबाबत महत्वाची माहिती त्यामध्ये दिली आहे. (How much salt in one day)

आपल्या शरीरासाठी थोड्या प्रमाणात मीठ आवश्यक आहे. परंतु त्याचे जास्त सेवन केल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. रक्तातील सोडियमचे प्रमाण सतत जास्त राहिल्यास हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, हृदयक्रिया बंद पडणे आणि किडनी खराब होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.

मिठाच्या अतिसेवनाचा पहिला परिणाम उच्च रक्तदाबाच्या रूपात होतो. डब्ल्यूएचओच्या मते, जगभरात सुमारे 1.28 अब्ज लोकांना उच्च रक्तदाब आहे. परंतु दुर्दैवाने त्यापैकी 46 टक्के लोकांना हे देखील माहित नाही की त्यांना रक्तदाबाचा आजार आहे. रक्तदाबाच्या बहुतांश घटनांमध्ये अतिरिक्त मीठ जबाबदार असते.

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार दरवर्षी सुमारे 2.5 दशलक्ष लोक जास्त प्रमाणात मिठाच्या सेवनामुळे मरतात. जर मिठाचे प्रमाण थोडे कमी केले तर यापैकी बहुतेक लोक मृत्यूपासून वाचू शकतात. म्हणूनच दररोज किती प्रमाणात मीठ खावे याची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

आहारात किती मीठ घ्यायला हवे?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, प्रौढ व्यक्तीने दररोज 2 ग्रॅमपेक्षा जास्त सोडियमचे सेवन करू नये. सोडियमचा मुख्य स्त्रोत मीठ आहे. आपण जे मीठ खातो ते सोडियम क्लोराईड असते. त्यात 40 टक्के सोडियम आणि 60 टक्के क्लोराईड असते. म्हणजेच, जर आपण दररोज 5 ग्रॅम मीठ खाल्ले तर साधारणपणे त्यात 2 ग्रॅम सोडियम असेल. एवढे मीठ आपल्यासाठी पुरेसे आहे.

पण सरासरी लोक रोज 9 ते 12 ग्रॅम मीठ खातात. मिठाच्या अतिवापरामुळे 30 लाख लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मृत्यू होतो. डब्ल्यूएचओ म्हणतो की मिठाच्या वापरामध्ये थोडीशी कपात केली तर दरवर्षी लाखो जीव वाचू शकतात.

मिठाच्या अतिसेवनामुळे हे आजार होतात

हार्वर्ड मेडिकल रिसर्चनुसार, जेव्हा शरीरात सोडियमचे प्रमाण वाढू लागते, तेव्हा किडनीवर अतिरिक्त दबाव येऊ लागतो. सोडियम रक्ताच्या नसांमध्ये पोहोचते आणि दबाव निर्माण करण्यास सुरवात करते. हे सोडियम रक्तातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त पाण्याची गरज असते. सोडियमचे प्रमाण रक्तात सतत जास्त राहिल्यास रक्ताच्या शिरांमध्येही पाणी सतत राहते. यामुळे रक्त पातळ राहील. या सर्वांचा परिणाम असा होईल की रक्त आणि द्रव दोन्हीचे प्रमाण वाढेल.

जेव्हा रक्ताचे प्रमाण जास्त असते तेव्हा हृदयावर अधिक दबाव येतो, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्ताच्या नसांवर अतिरिक्त दबाव असतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदय अपयशाचा धोका अनेक पटींनी वाढेल. काही अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सोडियमचे प्रमाण रक्तात सतत राहिल्यास किडनीलाही नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे हाडांचेही नुकसान होऊ शकते.

अंगावर सूज येण्यास सुरुवात होईल

मीठामध्ये सोडियम आणि पोटॅशियम मिसळले जाते. सोडियम आणि पोटॅशियम आपण खात असलेल्या बहुतेक अन्नामध्ये आधीपासूनच असतात. त्यामुळे 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास ते पचण्यासाठी मूत्रपिंडाला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते. यामुळे पोट लगेच फुगायला लागते आणि चेहरा फुगल्यासारखा दिसू लागतो. याशिवाय हात-पायांवरही सूज येऊ शकते. जास्त मीठ खाल्ल्यास व्यायाम केला तर ते घामासोबत बाहेर पडते.