| |

मधुमेहींच्या उत्तम आरोग्यासाठी हेल्दी आणि टेस्टी स्मूदी; जाणून घ्या साहित्य आणि कृती

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल बदलती जीवनशैली अनेको आजारांचे कारण असल्याचे समोर येत आहे. यात प्रामुख्याने अनेको लोक मधुमेहाच्या आजाराला बळी पडत आहेत. मधूमेह म्हणजे आपल्या शरीरातील रक्तात असणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी अधिक होणे. या आजाराचे एकंदरच दोन प्रकार आहेत. यातील मधुमेह प्रकार २’ने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सांगायचे विशेष म्हणजे, मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आपल्या दैनंदिन आहाराचं पथ्यपाणी सांभाळावे लागते. यासाठी प्रामुख्याने त्यांनी आपल्या आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश केल्याने त्यांना फायदा होतो. कारण फळं आणि भाज्यांमध्ये असणाऱ्या फायबर्स आणि नैसर्गिक स्वरूपातील साखर मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायक असते. म्हणूनच फळं आणि भाज्या यांचा एकत्रित वापर करून टेस्टी आणि हेल्दी स्मूदी बनवा. जी प्यायला चविष्ट आणि तब्यतीची काळजी घेण्यासाठी फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊयात स्मूदीचे वेगवेगळे पर्याय:-

० मधुमेहींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चविष्ट पर्याय म्हणून आपण ज्या स्मूदी पाहणार आहोत यांची नावे त्यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाना अनुसरून ठेवण्यात आली आहे.

१) रेड ज्युस
– लागणारे साहित्य
० 2 गाजर,
० 2 टोमॅटो
० १ लहान आकाराची भोपळी मिरची
० १/२ वाटी किसलेलं खोबरं
– करावयाची कृती
वरील साहित्य मिक्सरच्या सहाय्याने व्यवस्थित मिसळा आणि या मिश्रणाचा ज्युस तयार करून घ्या. यानंतर न गाळता हा ज्युस असाच प्या. कारण यामध्ये व्हिटॅमिन ए, अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक, मॅक्रो आणि मायक्रो मिनरल्स असतात. जे मधुमेहींसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

२) रेड – ग्रीन कॉम्बिनेशन
– लागणारे साहित्य
० 4 गाजर
० 2 कप पालकाचा रस
० मूठभर पार्सली / पुदीन्याची पानं
– करावयाची कृती
वरील सर्व साहित्य मिक्सरच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तयार मिश्रण गाळून प्या. या स्मुदीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमीन बी ६, आयर्न, मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे कोलेस्ट्रेरॉल व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

३) स्पाईसी स्मूदी
– लागणारे साहित्य
० 4 गाजरं,
० 5 टोमॅटो
० १ मूळा
० १ लहान आल्याचा तुकडा,
० 2 मिरच्या
– करावयाची कृती
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरच्या साहाय्याने ग्राइंड करून घ्या आणि तयार मिश्रण न गाळता प्या. यात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. शिवाय हिरव्या मिरच्या इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यासाठी मदत करतात. इतकेच नव्हे तर स्वादूपिंडाचे आरोग्य सुधारण्यासही मदत करतात.

४) टॅन्गी स्मूदी
– लागणारे साहित्य
० मध्यम आकाराचा दूधी,
० ४ भोपळ्या मिरच्या,
० ६ टोमॅटो
० काळ मीठ
० दालचिनी पूड
० मिरपूड
० हळद
– करावयाची कृती
यासाठी वरील सर्व साहित्य मिक्सरच्या सहाय्याने व्यवस्थित ग्राइंड करून याचे एकत्र मिश्रण करा. यामध्ये काळं मीठ, दालचिनीपूड, मिरपूड व हळद मिसळा आणि गाळून प्या. यातील दूधी भोपळ्यात फायबर असतात. ज्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. तसेच यात व्हिटॅमिन, आयर्न, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमदेखील आढळते. तसेच यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक या स्मूदीस हेल्दी बनवतात.

५) स्वीट ग्रीन स्मूदी
– लागणारे साहित्य
० १ काकडी,
० १ ग्रीन अ‍ॅप्पल,
० २ वाट्या पालक
० १/३ वाटी कोथिंबीर/ पुदीना
० १/२ इंच आलं
० २ चमचे लिंबाचा रस
– करावयाची कृती
यासाठी वरील सर्व साहित्य मिक्सरच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि या आंबट गोड स्मूदीची मजा घ्या. या स्मूदीत व्हिटॅमिन, मिनरल्स यांचा मुबलक साठा असतो.

० मधुमेहींसाठी महत्वाचे
– फळं आणि भाज्यांना एकत्र करून बनवलेल्या कोणत्याही ज्युसमधून मिनरल्स, व्हिटॅमिन्स मिळतात. तसेच फायबर्स मिळवण्यासाठी कॉम्प्लॅक्स कार्बोहायड्रेट पदार्थ खावेत. अर्थात ओट्स, ब्राऊन राईस आणि विविध डाळी यांचा आहारात समावेश करावा. स्मूदी चविष्ट लागल्यास जेवणाऐवजी केवळ ड्रिंक्सवर अवलंबून राहू नका.