Banana Peel
| |

केळीची साल करू शकते कमाल; जाणून घ्या आरोग्याशी संबंधित फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। केळं हे एक असं फळ आहे जे ७० ते ७५ टक्के लोकं खाणं पसंत करतात. हे फळ खाण्याची पद्धतही अगदी सोप्पी आहे. केवळ सालीचे आवरण काढले कि झालं. पण त्यानंतर सालीचं काय..? बरीच लोक केळी खाऊन त्याची सालं फेकून देतात. पण खरतर केळ्यांइतकेच त्याचे सालही उपयुक्त आहे. याच केळीच्या सालीची उपयुक्तता आणि आरोग्याशी संबंधित फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कदाचित आजनंतर पुन्हा तुम्ही केळ्याचे सेवन केले असता सालं फेकून देण्याची चुक करणार नाही.

वजन कमी करण्यासाठी वा वजन वाढविण्यासाठी केळ्याचा वापर केला जातो. कारण यामध्ये व्हिटॅमिन, खनिजे, प्रथिने, अँटी फंगल, फायबर इत्यादी मानवी शरीरास पोषक अशा घटकांचा समावेश आहे. अश्या या गुणकारी केळ्याची साल देखील अशीच अत्यंत उपयुक्त आहे. एका शास्त्रज्ञाच्या अभ्यासानुसार दररोज किमान २ केळीचे साल ३ दिवस खाल्ल्याने शरीरात सेरोटोनिन हार्मोनचे प्रमाण एक दोन नव्हे तर तब्बल १५ टक्क्यांनी वाढते. यामुळे मूड चांगला राहण्यासाठी अत्यंत मदत होते. तसेच केळीच्या सालामध्ये ट्रिप्टोफेन नावाचा एक मूल घटक असतो. ज्यामुळे मानवी शरीरातील थकवा विरतो आणि निवांत झोप येण्यास मदत मिळते.

तसेच केळीच्या सालामध्ये मूळ फळाच्या गरापेक्षा फायबरचे प्रमाण अत्याधिक आढळते. जे शरीरातील मेद वा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वेगाने कमी करण्यास मदत करतात. जेणे करून शरीरातील अनावश्यक चरबी वा लठ्ठपणा देखील कमी होतो. इतकेच नव्हे तर केळीच्या सालामध्ये ल्यूटिन नावाचा घटक असतो, जो डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी मदत करतो. या व्यतिरिक्त केळीचे साल शरीरातील लाल रक्त पेशींची संख्या कमी होण्यापासून अर्थात लाल पेशींना तुटण्या पासून रोखतो. ज्यामुळे शरीरातील पेशींचा समतोल राखला जातो.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, केळीच्या पिवळ्या सालांपेक्षा त्यांचे हिरवे साल जास्त गुणकारी व फायदेशीर असते. तसेच केळीचे साल त्वचेसाठीदेखील फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील मुरूम, सुरकुत्या, काळे डाग, खड्डे आणि अगदी डोळ्या खाली निर्जीव झालेली त्वचा जिला आपण डार्क सर्कल असे म्हणतो ते काढून टाकण्यास मदत करते. शिवाय केळीचे साल रक्त स्वच्छ करण्यात आणि बद्धकोष्ठता कमी करण्यात देखील मदत करते.