Heart Attack Stroke Risk
|

Heart Attack | सावधान ! तुम्हीही रात्री इतक्या वाजेपर्यंत जगात असाल तर येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

Heart Attack | मागील काही दिवसापासून हार्ट अटॅकमुळे आपला जीव गमावणाऱ्या लोकांची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने अनेक लोकांचा अचानक मृत्यू झाला आणि यामध्ये सामान्य लोक आणि सेलिब्रिटींचा समावेश आहे. अशातच हृदयविकारावरही अनेक प्रकारचे संशोधन सुरू आहे.

अलीकडेच एका संशोधनातून समोर आले आहे की, आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा संबंध हृदयाच्या आजारांशीही आहे. संशोधनानुसार, रात्री योग्य वेळी झोपल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येतो. एक्सेटर विद्यापीठाच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा- World Aids Day 2023 | आजही एड्स हा असाध्य आणि धोकादायक आजार, जाणून घ्या तो कसा टाळावा

झोप आणि हृदयरोग यांच्यातील संबंध | Heart Attack

अभ्यासानुसार जे लोक रात्री 12 वाजेपर्यंत जागे राहतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. स्लिप पॅटर्न आणि हृदयरोग यांचा थेट संबंध असल्याचे संशोधनात म्हटले आहे. या संशोधनात इंग्लंडमधील 88 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासात लोकांकडून त्यांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळांबद्दल माहिती घेण्यात आली. यासोबतच खाद्यपदार्थ आणि जीवनशैलीशी संबंधित इतर माहितीही घेण्यात आली.

अशा प्रकारे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो

संशोधनात सहभागी असलेल्या लोकांच्या वैद्यकीय नोंदींची चार वर्षे तपासणी करण्यात आली. अभ्यासानुसार, जे लोक रात्री 11 वाजण्यापूर्वी झोपतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी होते. त्याच वेळी, उशिरा किंवा रात्री 11 नंतर झोपणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका 35 टक्क्यांपर्यंत जास्त होता. संशोधनात असे म्हटले आहे की उशीरा झोपेमुळे शरीराची सर्केडियन रिदम बिघडू लागते. त्यामुळे हृदयावरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत संशोधकांनी लोकांना 11 वाजेपर्यंत झोपण्याचा सल्ला दिला आहे.

जीवनशैली आणि मानसिक आरोग्य

अमेरिकन हार्ट जर्नलनुसार, हृदयविकार टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली राखणे देखील महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत वेळेवर झोपणे आणि व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. यासोबतच मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यावरही तज्ज्ञांनी भर दिला. तसेच, अनुवांशिक कारणांमुळेही अनेकांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच याआधी किरकोळ हृदयविकाराचा झटका आला असला तरी पुन्हा हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. अनेकांना हृदयविकाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात.

या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे

  • आहारात चरबीचे प्रमाण कमी ठेवा.
  • तळलेले आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळा.
  • दर तीन महिन्यांनी हृदयाची तपासणी करा.
  • धुम्रपान करू नका कारण धूम्रपान करणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.