| |

हार्टबर्नची समस्या देते गंभीर आजारांचे संकेत; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो अनेकदा आपल्याला आपल्या शरीरात होणारे बदल वा शरीरात जाणवणारी समस्या हि मोठ्या आजाराचे संकेत देत असते. मात्र वेळीच हि लक्षणे लक्षात न आल्याने आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि यानंतर मोठ्या परिणामांना सामोरे जातो. जसे कि, हार्टबर्नची समस्या. या समस्येने अनेक लोक त्रस्त असतात. मात्र किरकोळ असेल असे म्हणून आपण याला सोडून देतो. मुळात हार्टबर्न म्हणजे काय?

– तर मित्रांनो हार्बरण हि अशी समस्या आहे जेव्हा मनुष्याच्या छातीत अगदी मध्यभागी खुप जळजळ जाणवते. ही समस्या काही मिनिटांपासून अनेक तासांपर्यंत जाणवू शकते. बहुतेकदा असे प्रेग्नंसी, गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज वा अँटी-इनफ्लेमेटरी ड्रग्ज घेतल्याने होते. मात्र अशी छातीत होणारी जळजळ काही बाबतीत गंभीर आजाराचे प्रमुख लक्षण वा संकेतसुद्धा असू शकते. एका संशोधनानुसार, हार्टबर्नची समस्या कॅन्सर आणि हार्ट अटॅकची जोखीम वाढण्यासंबंधी असू शकते.

० हार्टबर्नची लक्षणे:-

– छातीत जळजळ आणि वेदना,

– तोंड कडू होणे,

– झोपल्यानंतर वेदना वाढणे,

– चटपटीत खाल्ल्यानंतर घशापर्यंत जळजळ वाढणे हार्टबर्नची प्रमुख लक्षणे आहेत. यासह अशी कोणती लक्षणे आहेत जी गंभीर आजारांचे संकेत देतात ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) सतत छातीत जळजळ होणे.

२) छातीत होणारी जळजळ सतत जाणवणे.

३) गिळताना वेदना होणे.

४) अपचन, मळमळ, उलट्या होणे.

५) अचानक वजन कमी होणे.

६) सलग २ आठवड्यापर्यंत हार्टबर्नची लक्षणे राहणे.

७) घसा दुखणे आणि लाल होणे.

 

० ‘या’ आजाराचे संकेत असण्याची शक्यता :-

१) कॅन्सर – हार्टबर्न हि समस्या अनेकदा घसा वा पोटाच्या आतड्यांमधील कॅन्सरचे कारण असू शकते.

२) हायटस हर्निया – छातीत वेदना किंवा जळजळ हे ‘हायटस हर्निया’चे लक्षण आहे. आपल्या पोटाचा भाग डायफ्राममध्ये कमजोर झाल्यास छातीच्या खालील भागाला वरच्या बाजूला ढकलतो. या स्थितीला ‘हायटस हर्निया’ म्हणतात.

३) पेप्टिक अल्सर डिसीज – पेप्टिक अल्सरने प्रभावित लोकांच्या छातीत नियमित जळजळ होते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, हार्टबर्न आणि पेप्टिक अल्सर डिसीजची लक्षणे अगदी सारखीच असतात.

४) हार्ट अटॅक – हार्ट अटॅकची अनेक लक्षणे हार्टबर्नशी संबंधित असतात. छातीत वेदना, फास्ट हार्टबीट, ओलसर त्वचा, इनडायजेशन आणि मळमळणे ही लक्षणे हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणे आणि संकेत असू शकतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *