Here's how to make a homemade hair pack

अशा पद्धतीने तयार करा घरगुती हेअर पॅक

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । प्रत्येक महिला आपल्या केसांची काळजी हि वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. केसांच्या वाढीसाठी अनेक वेगवेगळे प्रयोग महिला आपली केसांसाठी करत असतात . आपले केस हे खूपच रुक्ष आणि कोरडे असतील तर त्याच्यासाठी घरगुती पद्धतीने तयार केलेले हेअर पॅक वापरू शकता. घरगुती कश्या पद्धतीने तुम्ही हेअर पॅक करू शकता ते जाणून घेऊया ..

काही प्रमाणात एक पूर्ण अवोकॅडो हे फळ घ्या. त्याच्यामध्ये काही प्रमाणात ऑलिव्ह तेलाचा वापर करा. ऑलिव्ह तेल हे आपल्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा खूप पोषक असते . त्याच्यामध्ये पाव वाटी नारळाचे बनवलेले ताजे तेल टाका. आणि साधे पाणी टाकून ते एकत्र मिसळा. तयार झालेले मिश्रण हे आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि केसांना रुक्ष करण्यापासून दूर करू शकता.

अवोकॅडो घेताना नेहमी पिकलेला घ्या . त्याच्यामध्ये खूप सारे जीवनसात्विक घटक असतात. ते आपल्या केसांच्यावाढीला पोषक असतात. त्यातील बिया मात्र त्या मिक्सर मध्ये घेऊ द्यायच्या नाहीत. त्या बियांचे औषधी गुणधर्म हे वेगवेगळे असू शकतात. हे मिश्रण हे साधारण विंचरले गेले असतील तर त्यावर हे तेल लावा. आणि कमीत कमी चार ते पाच मिनिटे आपल्या केसांची मसाज करा. त्याने केसांना फायदा हा होतोच . सर्वात महत्वाचे म्हणजे हि मिश्रण लावताना कमीत कमी तीन ते चार आठवडे हे मिश्रण आपल्या केसांना लावा. त्यांतरच फरक हा चांगला जाणवू शकतो.