holika

वेगवेगळ्या  प्रांतात अशी होते होळी साजरी

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  भारतीय परंपरेत अनेक सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. मार्च महिन्यात येणाऱ्या होळी सणाला प्रत्येक प्रांतात विशेष महत्व आहे. होळीचा सण हा वेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. उत्तर प्रदेशात हा सण खूप मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. होळी म्हंटली कि फक्त आपल्याला गुलालाची आणि रंगाची उधळण हाच प्रसंग समोर येतो. पण त्याव्यतिरिक्त होळी हि वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते . कोणत्या भागात कोणत्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो, ते जाणून घेऊया ….

महाराष्ट्रातील होळी —

महाराष्ट्रात या सणाला खूप महत्व आहे. गावाकडे हा सण परंपरा आणि प्रथा यांना अनुसरुन केला जातो. आजकाल नव्या रूढी , परंपरा नुसार हा सण साजरा केला जातो. परंतु हि चुकीची पद्धत आहे. होळी या सणाच्या दिवशी घरात गोड – धोड पदार्थ केले जातात. त्या दिवशी रात्रीची होलिका पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी धुळवड हा सण असतो. त्या दिवशी तिखट पदार्थ तयार केला जातो . धुळवड च्या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळला जातो. पण त्यानंतरच्या पाच दिवसांनी येणाऱ्या पंचमी च्या दिवशी खरं तर रंग हा उधळला पाहिजे . हि पारंपरिक पद्धत आहे.

अनेक ठिकाणी होळीच्या उत्सवाला “होलिकादहन” , “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी ओळखले जाते. कोकणात शिमगो म्हणतात. वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते. अनेक ठिकाणी होळीला शिमगा असेही म्हंटले जाते.

कोकणात साजरा होणारा होळी सण —

कोंकणात या सणाच्या आसपास शेतातील सर्व कामे हि झालेली असतात. कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गासाठी निवांत काळ असतो. या सणाच्या नंतर जवळपास ७ जून पर्यंत शेतकरी निवांत असतो. त्या काळात नोकरी करणारे लोक हे गावी येऊन निवांत राहत असतात. कोकणात हा सण १५ दिवस चालतो. काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो,  याला ‘भद्रेचा होम ‘ असे म्हणतात.

आदिवासी भागात —

भारतामध्ये आदिवासी हि जमात खूप मोठी आहे. त्या जमातीमध्ये सुद्धा हा सण आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी सगळे आदिवासी लोक हे एकत्र येतात होलिका पेटवून त्याच्या भोवती नृत्य करतात. त्या दिवशी सर्वांच्या घरी गोड पुरी , मासे आणि भात हा स्वयंपाक केला जातो. त्या दिवशी टिमक्या , ढोल याच्या मदतीने नृत्य केले जातात. त्या दिवशी वेगवेगळी नक्षीकाम केलेलं दागिने घातले जातात. आदिवासी स्त्रिया सुद्धा त्या दिवशी नृत्य करतात.