|

वेदनादायक गुडघेदुखीवर घरगुती उपाय परिणामकारक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। वाढते वय म्हटले कि सांधेदुखीच्या समस्या आपोआपच वाढीस लागतात. परिणामी गुडघे व शरीराचे इतर सांधे सतत दुखू लागतात. हे दुखणे एका वेळेनंतर इतके होते कि यासाठी विविध औषधोपचार आणि अगदी शस्त्रक्रिया देखील करावी लागते. याचे कारण असे कि, शरीरातील सांधे असे अवयव असतात जेथे दोन किंवा त्यापेक्षा जास्त हाडे एकमेकांना जुळलेले असतात. यांपैकी गुडघे हे देखील शरीराचे सांधेच आहेत. मुख्य म्हणजे गुडघेदुखीचा समस्या प्रामुख्याने विविध वयोगटातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. म्हणूनच आज आपण गुडघेदुखीवर रामबाण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने तुम्हाला गुडघेदुखीपासून आराम मिळेल. याआधी जाणून घेऊया गुडघेदुखीचा प्रमुख कारणे खालीलप्रमाणे:-

० कारणे –

१) इजा होणे वा मार बसणे – गुडघेदुखीचे प्रमुख कारण म्हणजे अवयवांना मार बसणे किंवा इजा होणे. शिवाय गुडघ्यावर मार बसला असेल तर गुडघ्यातील लिगामेंट्स आणि टेंडनला नुकसान पोहोचते.

२) लूज बॉडी – गुडघ्यात लिगामेंट हाडाचे लहान लहान भाग असतात. यांचा गुडघ्यातील प्रवाह थांबल्यास गुडघेदुखी होते. शिवाय ऑस्टियोआर्थराइटिस, ऑस्टियोमायइलिटिस, टेन्डीनिस, बेकर्स सिस्ट, घासलेला लिगामेंट, घासला गेलेला कार्टिलेज इ. गुडघेदुखीची प्रमुख कारणे असू शकतात.

० घरगुती उपाय –

१) हळद आणि चुना लेप – गुडघेदुखीवर घरगुती रामबाण उपाय म्हणजे हळद आणि चुना होय. हळद आणि चुना गुडघ्याचे दुखणे अगदी सहज आणि लवकर दूर करण्यात खूप सहाय्यक आहेत. यासाठी हळद आणि चुना मोहरीच्या तेलात मिसळून गरम करून घ्या. यानंतर हा लेप कोमट झाल्यानंतर गुडघ्यांवर लावा. हा उपाय केल्याने गुडघेदुखी नक्कीच कमी होईल.

२) मोहरीचे तेल – मोहरीचे तेल गरम करून हलके कोमट झाल्यानंतर गुढघ्यांना मसाज करा आणि पायाची हालचाल कायम ठेवा. यामुळे गुडघेदुखी हळू हळू कमी होते.

३) बर्फ उपचार – गुडघे भयंकर दुखत असतील आणि जर सुज आली असेल तर गुडघेदुखीवर आईस थेरेपी अर्थात बर्फाचा प्रयोग करा. कारण बर्फ गुडघ्याचे दुखणे व सुज कमी करण्यात सहाय्यक आहे. यासाठी एका पॅकेटमध्ये बर्फ टाकून किंवा आईस बॅगच्या सहाय्याने गुडघे शेकावे. यामुळे सुज कमी होते आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

० खास टिप्स –

१) रात्रीच्या वेळी हलका आहार घ्या – रात्रीच्या वेळी हरभरे, भेंडी, बटाटे, काकडी, मुळा, दही इत्यादी जड अन्न पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे शरीर जड होते. याशिवाय गुडघेदुखी असणार्‍यांनी रात्री दूध पिऊ नये.

२) गतिशील रहा – नेहमी कार्यरत व गतिशील राहिल्याने गुडघ्यांचा व्यायाम होतो. त्यामुळे नियमित व्यायाम, चालणे व मैदानी खेळ खेळणे अश्या सवयी असणाऱ्यांना गुडघेदुखीची समस्या होत नाही.

३) वजनावर नियंत्रण – शारीरिक वजन नियंत्रणात असेल तर गुडघे व पायांवर अधिक दबाव येत नाही. परंतु शरीराचे वजन अधिक असेल तर ते कंबर आणि पायांवर दबाव टाकते. ज्यामुळे शरीराचे कार्टिलेज तुटण्याचा धोका असतो. म्हणूनच वजन नियंत्रणात ठेवा.

४) नियमित योग आणि व्यायाम – योग आणि व्यायाम यांच्या मदतीने अनेक रोग शरीरापासून दूर ठेवता येतात. तसेच हे गुडघेदुखीसाठीदेखील परिणामकारक असते. त्यामुळे नियमित व्यायाम करा. कंटाळा करू नका आणि स्वस्थ रहा.