Home Remedies for Acne
|

चेहऱ्यावरचे खड्डे दूर करण्यासाठी ‘असे’ करा घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या चेहऱ्यासाठी प्रत्येक जण विशेष प्रयत्न करत असतात. अनेक महागड्या प्रॉडक्ट चा वापर करून सुद्धा चेहऱ्यावरचे मुरूम खड्डे दूर होत नाहीत. चेहऱ्यावरचे डाग कमी होण्यासाठी घरगुती पद्धतीचा वापर हा आपल्या चेहऱ्यासाठी लाभकारक ठरू शकतो. चेहरा हा सुंदर बनवायचा असेल तर घरात असलेल्या वस्तू वापरून तुमच्या चेहऱ्याला काही प्रमाणात ग्लो आणू शकता . त्यासाठी कश्या प्रकारे काळजी घेता येऊ शकते ते जाणून घेऊया ….

आपल्या घरात असलेल्या मुलतानी मातीचा वापर सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी केला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये समप्रमाणात लिंबाचा रस आणि गुलाबपाणी याचे मिश्रण एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण  आपल्या चेहऱ्यावर लावले जावे. हे कमीत कमी अर्धा तास आपल्या चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर थोड्या प्रमाणात सुकल्यानंतर थंड पाण्याच्या साह्याने आपल्या चेहऱ्यावरची मुलतानी माती काढून टाका . त्याने तुमच्या त्वचेवरचे डाग काही दिवसांत कमी कमी होत जातील. तसेच झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर कोरफडीचा रस हा आपल्या चेहऱ्यावर लावा. हा गर सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. तसेच चेहऱ्यावरचे डाग दूर करण्यासाठी आपल्या आजूबाजूला असलेल्या कडुलिंबाच्या पानाचा वापर हा आपल्या चेहऱ्यासाठी केला जावा.

अनेकांना खूप घाण सवय असते कि, आपल्याला एकदा पिंपल्स आला कि तो कधी फोडला जाईल याचा विचार केला जातो. आलेला पिंपल्स आपण जर फोडला तर मात्र आपल्या चेहऱ्यावर डाग ते  तसेच राहतात. त्यामुळे आलेल्या पिंपल्स या फोडल्या जाऊ नयेत. आपल्या आहारात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा वापर हा जास्त प्रमाणात केला नाही पाहिजे. तसेच आहारात पालेभाज्या यांचा समावेश हा जास्त असला पाहिजे. त्याच्यामध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते . त्यामुळे  पोटाच्या समस्या या दूर होऊ शकतात.   पोट जर व्यवस्थित साफ झाले तर  तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या पिंपल्स येत  नाहीत.